ब्रिटनमधील दाऊद इब्राहिमची ४ सहस्र कोटी रुपयांची संपत्ती जप्त

लंडन – आंतरराष्ट्रीय आतंकवादी दाऊद इब्राहिम याची ब्रिटनमधील सुमारे ४ सहस्र कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. ब्रिटनमधील वृत्तपत्र बर्मिंघम मेलने फोर्ब्ज बिझनेस मासिकाच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. या वृत्तात कासकर दाऊद इब्राहिम असा त्याचा उल्लेख केला आहे. दाऊदची जगभरात ४२ सहस्र कोटी रुपयांची संपत्ती आहे. कोलंबियाचा अंमली पदार्थ तस्कर पाब्लो एस्कोबार याच्यानंतर दाऊद जगातील दुसरा सर्वात श्रीमंत गुन्हेगार आहे. ब्रिटनने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला. त्यात दाऊद २१ बोगस नावांनी रहात असल्याचे म्हटले आहे.


Multi Language |Offline reading | PDF