बळी दिलेल्या प्राण्याचे रक्त गंगानदीमध्ये वाहू देण्यास अनुमती आहे, तर मूर्तींचे विसर्जन करण्यास का नाही ? – हिंदूंची उच्च न्यायालयात याचिका

उच्च वाराणसी – येथील दुर्गापूजा संस्थांनी गंगानदीमध्ये मूर्तीच्या विसर्जनासाठी पुन्हा एकदा अनुमती मिळावी, यासाठी अलाहाबाद उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली आहे. २०१४ मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने राज्यभरात गंगा नदीमध्ये मूर्ती विसर्जन करू नये, असा आदेश दिला होता. जर बकरी ईदच्या वेळी मुसलमानांनी बळी दिलेल्या प्राण्यांचे रक्त नदीत सोडण्यास न्यायालयाचा आक्षेप नसेल, तर नदीत मूर्तीच्या विसर्जनासाठीदेखील अनुमती द्यावी, अशी मागणी या जनहित याचिकेत करण्यात आली आहे. ही याचिका सार्वजनिक दुर्गोत्सव समिती आणि केंद्रीय पूजा समिती यांच्या वतीने प्रविष्ट करण्यात आली आहे.

याचिकेत पुढे म्हटले आहे की, ईदच्या कालावधीत लाखो बकर्‍यांचा बळी दिला जातो आणि लाखो लिटर रक्त नदीत जाते, जे आरोग्यासाठी केवळ घातक नाही तर रोगराई पसरण्याची शक्यता वाढते. जो धर्मांध समुदाय मूळ भारतीय नाही, त्यांना त्यांच्या धर्माचे पालन करण्याची अनुमती आहे; पण मूळ भारतीय धर्मियांनाच अशी अनुमती का नाही ? घाणपाणी प्रक्रिया केंद्रे रक्तावर प्रक्रिया करू शकत नाहीत; कारण ते हानिकारक रोगजनुकांने युक्त असते. त्यामुळे असे रक्त गंगा नदीत सोडण्याची अनुमती नसावी. दुर्गापूजा मंडळांनी या प्रकरणावर उपाय शोधण्याचा अजून एक मार्ग अवलंबला आहे. त्यांनी अनेक पत्रे आणि विनंत्या यापूर्वीच राज्यपाल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे पाठवल्या आहेत.


Multi Language |Offline reading | PDF