आंध्रप्रदेशात मुसलमान मुलीशी प्रेम केल्यामुळे धर्मांधांकडून हिंदू तरुणाची हत्या

देशात लव्ह जिहादवर कोणतीही कारवाई होत नाही; मात्र हिंदु मुलाने अन्य धर्मीय तरुणीशी प्रेम केले, तर त्याला ठार केले जाते !

हिंदुद्वेष नसानसात भरलेले धर्मांध !

कुप्पम (आंध्रप्रदेश) – मुसलमान मुलीशी प्रेम केल्यामुळे धर्मांधांनी आंध्रप्रदेशच्या चित्तूर जिल्ह्यातील कुप्पम शहरात रहाणार्‍या उपेंद्र (वय ३१ वर्षे) याला चाकूने भोसकून ठार केले, तर त्याच्या आईवर उकळते पाणी फेकून तिला गंभीररित्या घायाळ केले. ३ सप्टेंबरच्या रात्री शेजारीच रहाणार्‍या धर्मांधांच्या घरातील ८ जणांनी हे आक्रमण केले. ‘न्यू इंडियन एक्स्प्रेस’ने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

या घटनेनंतर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कुप्पम शहरात १४४ कलम लागू केले होते. तसेच पोलीस कुमकही वाढवण्यात आली होती. याप्रकरणी त्या मुसलमान कुटुंबातील ४ सदस्यांना अटक करण्यात आली आहे, तर ४ सदस्य फरार आहेत.


Multi Language |Offline reading | PDF