सरकारी बँकांकडे असलेली श्रीमंतांची मोठ्या प्रमाणावरील थकीत अनुत्पादित कर्जे म्हणजे देशापुढील सर्वांत मोठी समस्या !

समस्या निर्माण होईल एवढ्या प्रमाणात कर्जाचे प्रमाण वाढेपर्यंत बँका काय करत होत्या ?

पुणे – देशातील सरकारी बँकांकडे श्रीमंतांची मोठ्या प्रमाणावर थकीत अनुत्पादित कर्जे आहेत. ती देशापुढील सर्वांत मोठी समस्या आहे, असे मत केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी १० सप्टेंबर या दिवशी व्यक्त केले. सरकारी बँकांकडील थकीत कर्जे वसूल करण्यासाठी केंद्र सरकारने कठोर पावले उचलली आहेत. ती वसूल झाल्यास हा पैसा ग्रामीण भागाच्या विकासासाठी वापरता येईल आणि त्यातून बँकांची विश्‍वासार्हता वाढेल, असेही ते म्हणाले. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शताब्दी वर्षांच्या सांगता सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.


Multi Language |Offline reading | PDF