बाबा राम रहीम यांच्याकडून हिंसाचाराची हानीभरपाई वसुली केली जाते, तशीच जयपूर येथे दंगल करणार्‍यांकडूनही वसूल करावी ! – सुरेश चव्हाणके, संपादक, सुदर्शन टीव्ही  

नोएडा (उत्तरप्रदेश) – बाबा राम रहीम यांना शिक्षा झाल्यानंतर हरियाणामध्ये हिंसाचार झाला. यात कोट्यवधी रुपयांची हानी झाली. ही हानीभरपाई बाबा राम रहीम यांच्या संपत्तीतून वसूल करण्यात यावी, असा आदेश न्यायालयाने दिला. तशीच हानीभरपाई जयपूर येथे दोन दिवसांपूर्वी धर्मांधांकडून झालेल्या दंगलीच्या प्रकरणी वसूल करण्यात यावी, अशी मागणी सुदर्शन टीव्ही या वाहिनीचे संपादक श्री. सुरेश चव्हाणके यांनी सामाजिक माध्यमातून केली आहे. बाबा राम रहीम यांची संपत्ती विकून हानीभरपाई वसूल केली जाणार आहे, त्याचप्रमाणे जयपूरमध्ये दंगल करणार्‍या धर्मांधांची संपत्ती विकून ती वसूल करावी, असेही ते म्हणाले आहेत. या हिंसाचारात १ जण ठार, तर ८ पोलीस घायाळ झाले होते. पोलिसांचे वाहन जाळण्यात आले होते.


Multi Language |Offline reading | PDF