बांगलादेशमध्ये हिंदु शिक्षिकेवर धर्मांधांकडून सामूहिक बलात्कार !

बांगलादेशमध्ये असुरक्षित हिंदु !

बांगलादेश मायनॉरिटी वॉचकडून गुन्हेगारांवर कठोर कारवाईची मागणी

म्यानमारमधील रोहिंग्या मुसलमान आतंकवादी असले, तरी त्यांच्यासाठी भारतातील मुसलमान आवाज उठवतात; मात्र पाक, बांगलादेश येथील निरपराध हिंदूंसाठी भारतातील हिंदू काहीच बोलत नाहीत !

म्यानमारमधील रोहिंग्यांसाठी अश्रू ढाळणारे भारतातील इमाम, मौलवी या हिंदूंविषयी काहीच बोलत नाहीत !

ढाका – बांगलादेशच्या बरगुणा जिल्ह्यातील बेटागी उपजिल्ह्यामध्ये शासकीय शाळेतील एका ३० वर्षीय हिंदु शिक्षिकेवर अनेक धर्मांधांनी सामूहिक बलात्कार केला. ही घटना १७ ऑगस्टला शाळेच्या आवारातच घडली, असे वृत्त दैनिक बांगलादेश प्रोटिडिनने प्रसिद्ध केले आहे. या प्रकरणी बांगलादेश मायनॉरिटी वॉचने पोलिसांशी संपर्क साधून गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

१७ ऑगस्टला पीडित शिक्षिका शाळेचे वर्ग सोडल्यानंतर शाळेच्या आवारात त्यांच्या पतीशी बोलत होती. त्या वेळी काही धर्मांधांनी अनुमतीविना शाळेच्या आवारात प्रवेश केला आणि त्यांना त्रास देणे चालू केले. पीडित शिक्षिकेने आपण पतीशी बोलत आहे, असे सांगितले. त्याकडे दुर्लक्ष करून त्या धर्मांधांनी त्या शिक्षिकेच्या पतीला एका खोलीमध्ये बंद केले. त्यानंतर शिक्षिकेला दुसर्‍या खोलीत नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पीडित महिला शिक्षिकेने आरडाओरड केली; परंतु कोणीही त्यांच्या साहाय्यासाठी पुढे सरसावले नाही.

बलात्कारानंतर धर्मांधांनी त्या ठिकाणाहून पळ काढला. पीडित महिलेला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पीडित महिलेच्या वतीने बेटागी पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

या घटनेची माहिती कळताच बांगलादेश मायनॉरिटी वॉचचे अध्यक्ष अधिवक्ता रवींद्र घोष यांनी वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांशी संपर्क साधून हिंदु शिक्षिकेवर बलात्कार करणार्‍या गुन्हेगारांना अटक करण्याची मागणी केली आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now