(म्हणे) ‘सनातनकडून पुरोगामी विचारवंत, सैनिक, न्यायसंस्था, राजकीय पुढारी असा टप्पानिहाय हत्यांच्या कट !’

शाम मानव यांचे फुत्कार !

धादांत खोटी विधाने करून सनातन संस्थेची वारंवार अपकीर्ती करणारे अंनिसचे शाम मानव यांच्यावर कायदेशीर कारवाई होण्यासाठी सनातन अधिवक्त्यांचा समुपदेश घेत आहे !

धुळे – डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्येमागे सनातन संस्थेचाच हात आहे. त्यामुळे पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येमागेही सनातन संस्थाच असू शकते. सनातन संस्थेद्वारे पुरोगामी विचारवंत, सैनिक, न्यायसंस्था, राजकीय पुढारी असा टप्पानिहाय हत्यांच्या कटाचा कार्यक्रम होत आहे, अशी धादांत खोटी विधाने अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष शाम मानव यांनी येथे ९ सप्टेंबर या दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेत केली.

सनातनवर गरळओक करतांना मानव पुढे म्हणाले की,

१. सनातन संस्था ही ‘मानवी रोबो’ निर्माण करणारी संस्था असून तरुणांचा ‘ब्रेन वॉश’ करून ‘या जगात सैतानाचे राज्य आहे. ते नष्ट करून या पृथ्वीवर देवाचे राज्य निर्माण करायचे आहे’, असे विचार बिंबवण्याचे कार्य करते. (अभ्यासहीन विधाने करून वारंवार स्वतःचे हसे करून घेणारे शाम मानव ! सनातनचे कोणतेही साधक ‘ब्रेन वॉश’ नाहीत. त्यांना बुद्धीच्या आणि मनाच्या स्तरावर पटलेले आहे की, कोणती गोष्ट योग्य आहे, कोणती अयोग्य आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी अध्यात्मातील कृती केल्या आहेत. त्यानंतर साधनेतून आलेली अनुभूती आहे. त्याच्यातून निर्माण झालेली श्रद्धा आहे. जे अनेक संतांनी मांडले आहे, तेच सनातनने मांडले आहे. साधकांचा त्याग, सेवा यांतून ही संस्था उभी राहिली आहे आणि वेगाने वाढत आहे. ‘जगात सैतानाचे राज्य आहे’, असे विचार सनातनने कधीही बिंबवण्याचा प्रयत्न केलेला नाही, उलट समाज आदर्श बनावा, यासाठी साधना आणि धर्माचरणाचे महत्त्व समाजावर बिंबवण्याचेच कार्य सनातन संस्था निःस्वार्थी वृत्तीने करत आहे ! सनातनचे कार्य वाढत असल्यामुळेच शाम मानव यांच्यासारख्या सनातनद्वेष्ट्यांना पोटशूळ उठत असून ते ईर्षेतूनच सनातनवर असे आरोप करत आहेत ! – संपादक)

२. हत्या प्रकरणांशी संबंधितांना अटक केल्यानंतर ते सनातन संस्थेशी संबंधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. (अटक केलेल्यांच्या विरोधात काहीही पुरावे सापडलेले नाहीत, याविषयी मानव यांना काय म्हणायचे आहे ? – संपादक)

३. यापूर्वीही मी शासन अणि पोलीस यांच्या निदर्शनास या घटना आणून दिल्या आहेत. (तरीही शासनाने त्यावर कोणतीही कृती केली नाही, याचा अर्थ ‘या गोष्टी निरर्थक आणि आधारहीन आहेत’, हे शासनाच्या लक्षात आले आहे, असाच त्याचा अर्थ आहे ! तरीही मानव परत परत तेच तेच सांगण्याचे काही थांबवत नाहीत ! – संपादक)

(म्हणे) ‘मोक्षप्राप्तीसाठी गुरु हीच अंधश्रद्धा !’ – शाम मानव

अंधश्रद्धा बाळगणार्‍यांनी अशी विधाने करणे म्हणजे ६ आंधळ्यांनी हत्तीचे अवयव ओळखण्यासारखे आहे !

गुरूंची महती जाणण्यासाठी साधना करावी लागते, हेही माहीत नसलेले मानव म्हणे अंधश्रद्धांचे निर्मूलन करणार !

जळगाव – समाजाला चुकीचे संस्कार देणारे बाबा-बुवा अंधश्रद्धा पसरवण्याचे काम करतात. देवप्राप्तीच्या दिशेने प्रयत्न करणार्‍यांना म्हणे, मधल्या काळात सिद्धी प्राप्त होते. मग तो चमत्कार करू शकतो, असा चुकीचा संस्कार केला जातो. अशा प्रकारच्या भूलथापांना लोकांनी बळी बडू नये. मोक्षप्राप्तीसाठी साधना करणे हीच मुळी अंधश्रद्धा आहे, अशी विधाने अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष शाम मानव यांनी केली.

शाम मानव म्हणतात,

१. रामरहिम, आसाराम, काटेलचा गुलाबबाबा, असलमबाबा यांच्यासारखे भोंदूबाबा श्रीकृष्णाचे नाव घेऊन स्त्रियांचा वापर करून घेतात.

२. संत तुकाराम महाराज हे सदेह वैकुंठाला गेले नाहीत, तर त्यांचा खून भटांनी केला आहे, असे प्रबोधनकार ठाकरे यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे. आता याविषयी धर्मांध शक्तींनी माझ्याशी लढण्यापेक्षा प्रबोधनकारांचे वंशज उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे यांना विचारावे.


Multi Language |Offline reading | PDF