बांगलादेशमध्ये धर्मांधांकडून हिंदु देवतांच्या मूर्तींची तोडफोड

बांगलादेशमध्ये असुरक्षित हिंदु मंदिरे !

म्यानमारमधील रोहिंग्या मुसलमानांविषयी कळवळा दाखवणारे भारतातील इमाम, मौलवी बांगलादेशातील हिंदूंविषयी का बोलत नाहीत ?

ढाका (बांगलादेश) – माणिकगंज जिल्ह्यातील सिंगेर उपजिल्ह्यामधील सोलाई बांगला गावामध्ये ४ सप्टेंबरच्या रात्री काही धर्मांधांनी मंदिरांवर आक्रमण करून हिंदूंच्या देवतांच्या मूर्तींची तोडफोड केली. धर्मांधांनी येथील श्री रक्षा काली मंदिर आणि श्री लोखनात मंदिर यांवर आक्रमण केले. मंदिरांची कुलुपे तोडून आत प्रवेश केला. आतील १० मूर्तींची तोडफोड करून त्यांची विटंबना केली. मंदिराचे पुजारी लालचंद राजबंगशी यांनी महंमद जलील, तुली खतुन, महंमद फरूक, महंमद सहार अली, महंमद बहर अली यांच्या विरोधात सिंगेर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. या भागात हिंदु नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

या घटनेची माहिती मिळताच ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे अध्यक्ष अधिवक्ता रवींद्र घोष यांनी सिंगेर पोलीस ठाण्याच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधून हिंदूंच्या देवतांच्या मूर्तींची तोडफोड करणार्‍यांना अटक करण्याची मागणी केली. ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे एक पथक या मंदिरांना भेट देऊन हानीविषयी आढावा घेणार असल्याचे अधिवक्ता रवींद्र घोष यांनी सांगितले.


Multi Language |Offline reading | PDF