वर्ष २०१९ पर्यंत राममंदिराचे काम चालू न झाल्यास देशभर आंदोलन करू ! – महंत सुरेश दास, दिगंबर आखाडा

महंतांना अशी चेतावणी द्यावी लागते, याचा अर्थ त्यांचा सरकारवर विश्‍वास नाही !

गोरखपूर (उत्तरप्रदेश) – वर्ष २०१९ पर्यंत राममंदिराचे बांधकाम चालू झाले नाही, तर संतसमाज देशात निर्णायक आंदोलन चालू करील, अशी चेतावणी अयोध्येतील दिगंबर आखाड्याचे महंत सुरेश दास यांनी येथे दिली. ‘केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात योगी आदित्यनाथ यांचे सरकार आहे. राममंदिराच्या उभारणीसाठी आता कोणतीही बाधा नाही. राममंदिराची उभारणी भाजप सरकारचे नैतिक दायित्व आहे’, असेही ते म्हणाले. ब्रह्मलीन महंत दिग्विजयनाथ आणि अवेद्यनाथ यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमासाठी आले असता पत्रकारांशी ते बोलत होते. महंत पुढे म्हणाले की, येथील गोरक्षपिठाने नेहमीच राममंदिराच्या उभारणीचे समर्थन केले आहे. अशा वेळी सत्तेत आल्यानंतर त्यांच्यावरील दायित्व वाढले आहे. जर घटनात्मक अडचण असेल, तर लोकसभा आणि विधानसभा येथे कायदा बनवावा. आता कोणतेही कारण ऐकले जाणार नाही.


Multi Language |Offline reading | PDF