शामली (उत्तरप्रदेश) येथील अल्पवयीन हिंदु मुलीचे धर्मांधांकडून अपहरण आणि सामूहिक बलात्कार

योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्था अधिक कठोर करून धर्मांधांची गुन्हेगारी कायमची मोडून काढली पाहिजे, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे !

लक्ष्मणपुरी – उत्तरप्रदेशच्या शामली शहरातील एका १५ वर्षीय हिंदु मुलीचे ३ धर्मांध तरुणांनी २ सप्टेंबर या दिवशी अपहरण केले. अपहरणकर्त्यांनी तिला हरियाणातील पानिपत येथे नेऊन ४ दिवस तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर तिला शामली शहरात बेशुद्धावस्थेत सोडून देऊन धर्मांध युवकांनी पळ काढला.

२ सप्टेंबरला दुपारी साडेचार वाजता बाजारात गेलेली मुलगी उशिरापर्यंत न परतल्याने तिच्या पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली होती. ४ दिवसांनी पोलिसांनी मुलीच्या पालकांना दूरभाष करून त्यांची मुलगी जिंजाना रस्त्यावर बेशुद्धावस्थेत सापडल्याचे सांगितले. शुद्धीवर आल्यावर मुलीने सर्व घटना तिच्या पालकांना सांगितली. ३ धर्मांधांनी तिला पळवून नेऊन पानिपत येथे तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचे सांगितले. याप्रकरणी पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

पश्‍चिम उत्तरप्रदेशमधील शामली आणि मुजफ्फरनगर या जिल्ह्यांमध्ये हिंदु महिलांवरील बलात्काराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहेत. गेल्या वर्षी मुजफ्फरनगर क्षेत्रात २ आठवड्यांच्या काळात ७ बलात्काराची प्रकरणे घडली होती, असे वृत्त ‘हिंदु पोस्ट’ने प्रसिद्ध केले होते.


Multi Language |Offline reading | PDF