हिंदूंच्या मुलींचे अपहरण करून त्यांच्यावर अत्याचार करणे सहन केले जाणार नाही ! – कैराना (उत्तरप्रदेश) येथील भाजपचे खासदार हुकूम सिंह

कैराना (उत्तरप्रदेश) – काही लोकांमध्ये इतके साहस निर्माण झाले आहे की, ते अल्पवयीन मुलींना पळवून नेतात, त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करतात. यामागे काय कारण आहे ? तुम्ही कल्पना करू शकता की, भारतात असे होऊ शकते, तर पाकिस्तानमध्ये रहाणार्‍या हिंदूंची काय स्थिती होत असेल ? थोडा विचार केला, तर असे लक्षात येईल की, या अत्याचारी लोकांवर संस्कारच तसे झाले आहेत. त्यांना हेच शिकवले जाते. ‘तुम्हाला हेच करायचे आहे’, असे सांगितले जाते, असे परखड विचार भाजपचे येथील खासदार हुकूम सिंह यांनी येथे केले. शामली येथे हिंदु मुलीचे अपहरण करून तिच्यावर काही धर्मांधांनी सामूहिक बलात्कार केल्याच्या घटनेवर येथे आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. ‘हिंदूंच्या मुलींचे अपहरण करून त्यांच्यावर अत्याचार करणे सहन केले जाणार नाही’, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हुकूम सिंह पुढे म्हणाले की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ असतांनाही या लोकांचे असे साहस होते की, ते मुलींना पळवून त्यांच्यावर अत्याचार करतात.


Multi Language |Offline reading | PDF