पुणे विद्यापिठात गौरी लंकेश हत्येच्या निषेध सभेत विद्यार्थी संघटनांमध्ये तणाव

सध्याची विद्यापिठे हे शिक्षणापेक्षा राजकारणाचे अड्डे झाले आहेत. त्यांना या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी शासनाने तात्काळ उपाययोजना करणे आवश्यक !

अभाविपने सभा उधळल्याचा आरोप

पुणे – पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या निषेधार्थ ‘स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया’ने (एस्एफ्आय) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठात निषेध सभेचे आयोजन केले होते. त्या निषेध सभेत एस्एफ्आय आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या विद्यार्थी संघटनांमध्ये तणाव निर्माण झाला. त्यानंतर दोन्ही संघटनांमध्ये तणाव वाढल्याने विद्यापिठाच्या सुरक्षा विभागाने पोलिसांना पाचारण केल्यावर हा वाद मिटला. त्या वेळी अभाविपने सभा उधळल्याचा आरोप ‘एस्एफ्आय’चे सतीश दबडे यांनी केला.

अभाविपचे अध्यक्ष श्रीराम कंधारे म्हणाले, ‘‘गौरी लंकेश यांच्या हत्येचा निषेधच आहे; पण सभेच्या वेळी आक्षेपार्ह वक्तव्ये करण्यात आली. त्यामुळे ‘नक्षलवादी आदिवासींवर अत्याचार करतात, त्याचा निषेध कधी करणार ?’  एवढाच प्रश्‍न आम्ही उपस्थित केला.’’

यापूर्वी विद्यापिठातील दोन्ही विद्यार्थी संघटनांमध्ये काही मासांपासून तणावाचे वातावरण आहे. काही दिवसांपूर्वी वरील दोन्ही संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये मारामारी झाली होती आणि त्या वेळी दोघांनी एकमेकांविरोधात पोलिसांत तक्रार केली होती. परिणामी चतु:शृंगी पोलिसांनी दोन्ही संघटनेच्या कार्यकर्त्यांना अटक केली होती आणि सध्या ते कार्यकर्ते जामिनावर बाहेर आहेत.


Multi Language |Offline reading | PDF