श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळ मुंबई उच्च न्यायालयात नवीन मागणीपर याचिका प्रविष्ट करणार

श्री गणेशोत्सव खरे जनक कोण, याचा शोध घेण्यासाठी तज्ञांची समिती नेमावी !

पुणे – गणेशोत्सव उत्सवाचे खरे जनक कोण ? कोणत्या वर्षी गणेशोत्सवास प्रारंभ झाला, याचा शोध घेण्यासाठी तज्ञांची समिती नेमावी, या मागणीसाठी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळ मुंबई उच्च न्यायालयात नवीन याचिका येत्या १५ दिवसांत प्रविष्ट करणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे कायदेविषयक समादेशक अधिवक्ता मिलिंद पवार यांनी दिली. या वेळी मंडळाचे विश्‍वस्त सूरज रेणुसे उपस्थित होते. ‘भाऊसाहेब रंगारी हेच गणेशोत्सवाचे जनक आणि लोकमान्य टिळक प्रचारक असल्याचे जाहीर करावे’, अशा आशयाची याचिका उच्च न्यायालयात मंडळाने प्रविष्ट केली होती. त्यावर न्यायालयाने सुनावणी करत २ आठवड्यांत म्हणणे मांडण्याचा आदेश न्यायालयाने राज्य शासनाला दिला होता.

६ आणि ७ सप्टेंबरला वरील याचिकेवर झालेल्या सुनावणीत न्यायालयाने सुचवले की, आता गणेशोत्सव संपला आहे. त्यामुळे याचिका मागे घेऊन वरील नवीन याचिका प्रविष्ट करावी. त्यानुसार मंडळाने पहिली याचिका मागे घेतली आहे.


Multi Language |Offline reading | PDF