परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे १६ वर्षांपूर्वीचे बोल सत्यात उतरून ‘संगीत’ आणि ‘नृत्य’ या कलांच्या माध्यमांतून आपोआप साधना होत असल्याची सौ. अनघा जोशी यांना आलेली प्रचीती !

सौ. अनघा जोशी

१. १६ वर्षांपूर्वी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘संगीत’ आणि ‘नृत्य’ यांविषयी साधिकांना केलेले मार्गदर्शन

१ अ. प.पू. गुरुदेवांनी ‘संगीत’ आणि ‘नृत्य’ या विषयांवर प्रश्‍न विचारणे अन् ‘कलेच्या माध्यमातून दोघी बहिणींची साधना होणार आहे’, याचे सूतोवाचकरणे : ‘वर्ष २००१ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले अमरावती येथील सनातनच्या सेवाकेंद्रात आले होते. तेव्हा आम्ही पात्रीकर कुटुंबीयही तेथेच रहात होतो. त्या वेळी प.पू. गुरुदेवांनी ‘संगीत’ आणि ‘नृत्य’ या विषयांवर मला अन् माझी मोठी बहीण कु. तेजलताई हिला काही प्रश्‍न विचारलेे. त्यांनी आम्हाला संगीताविषयी काही सूत्रेही सांगितली. त्यांच्याशी बोलतांना मी त्यांना सांगितले, ‘‘विठाई किठाई माझे कृष्णाई, कान्हाई…’ या ज्ञानदेवांच्या भक्तीगीतावर नृत्य करतांना माझी खूप भावजागृती झाली होती.’’ त्या वेळी प.पू. गुरुदेव म्हणाले, ‘‘आता संकट काळ (आपत्काळ) असल्याने सध्या करत असलेली साधनाच चालू ठेवा. योग्य वेळ आल्यावर कलांच्या संदर्भात आपण पुढील प्रक्रिया करू. तुम्हा दोघींची साधना कलेच्या माध्यमातून होणार आहे.’’

२. १६ वर्षांनंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘संगीत’ आणि ‘नृत्य’ या कलांचा चालू करायला सांगितलेला अभ्यास !

२ अ. ‘प.पू. गुरुदेवांनी संगीताचा अभ्यास करायला सांगितले’, हे कळल्यावर आनंद होणे : प.पू. गुरुदेवांनी एप्रिल २०१६ मध्ये तेजलताईला संगीताचा अभ्यास करण्याचा निरोप पाठवला. ताईकडून याविषयी मला कळल्यावर माझ्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटल्या. पुढे दोन दिवस मी आनंदाची स्थिती अनुभवत होते.

२ आ. अकस्मात् नृत्य करण्याची इच्छा होणे

२ आ १. नृत्य करतांना चैतन्य आणि आनंद अनुभवणे : १५.१२.२०१६ या दिवशी रात्री मी खोलीत दैनंदिन चुकांची सारणी लिखाण करतांना ‘दाता तू गणपति गजानन’ हे भक्तीगीत ऐकत होते. अकस्मात् मला नृत्य करावेसे वाटून मी नृत्य करू लागले. जवळपास १ घंटा मी नृत्य करत होते. त्या वेळी मला चैतन्य आणि आनंद जाणवत होता.

२ आ २. ‘नृत्य करतांना मुद्रांचा अभ्यास करूया’, असे आतूनच सुचणे आणि मुद्रा केल्यामुळे चैतन्याचा परिणाम अधिक जाणवणे : २०.१.२०१७ या रात्री मला ‘मुद्रांकडे लक्ष देऊन नृत्य करावे आणि काय जाणवते ते पहावेे’, असा विचार येऊन माझ्याकडून विविध भक्तीगीतांवर नृत्य केले गेले. त्या वेळी नृत्यातील काही मुद्रा आठवल्या आणि मी त्याप्रमाणे करून पाहिले. कदाचित् मुद्रांमुळे असेल; पण या वेळी नृत्य करतांना मला चैतन्याचा परिणाम अधिक जाणवला. मी रात्री ११.१५ ते १२.३० वाजेपर्यंत नृत्य केले. त्या वेळी मला ‘नृत्य थांबवूूच नये’, असे वाटत होतेे आणि माझी पुष्कळ भावजागृती होत होती. नृत्याच्या शेवटी माझ्याकडून डोळ्यांचे विविध प्रकार केले गेले. पुष्कळ दिवसांनी एवढा वेळ नृत्य केले आणि त्यातून माझ्यावर उपायच झाले. दुसर्‍या दिवशीही मला थकवा न जाणवता उलट उत्साहच जाणवत होता. नृत्य करतांना मला श्रीकृष्णाचे अस्तित्व जाणवत होते.’

– सौ. अनघा जोशी, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

२ आ २ अ. नृत्यात डोळ्यांचे महत्त्व ! : ‘डोळ्यांना नृत्याचा ‘प्राण’ म्हणतात. डोळ्यांतून भाव आणि भावना यांचे योग्य प्रकटीकरण होते. डोळ्यांना शरिराच्या हालचालींची सम्यक साथ मिळाल्यास नृत्य उत्तमरित्या साकार होते. नृत्यात डोळ्यांचा योग्य प्रकारे वापर न केल्यास नृत्य रूक्ष किंवा निःस्तेज होते.’

– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

२ आ २ आ. शास्त्र सिद्ध होणे : ‘श्री. राम होनप यांंना मिळत असलेल्या ज्ञानाविषयी सौ. अनघाला कोणतीच कल्पना नव्हती, तरी रामदादांचे ज्ञान आणि तिच्या काही अनुभूती आपोआप जुळतात. याविषयी प.पू. गुरुदेेवांना सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘यालाच ‘शास्त्र सिद्ध होणे’, असे म्हणतात.’’

– कु. तेजल पात्रीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

२ इ. ‘प.पू. गुुरुदेवांनी एका साधिकेला नृत्याचा सराव करण्यास सांगितले’, हेे ऐकल्यावर ‘त्यांच्या संकल्पानेच स्वतःची नृत्यकला चालू झाली’, हेे लक्षात येणेे : ‘मी तेजलताईला मला अकस्मात् नृत्य करावेसे वाटल्याचे सांगितले. त्या वेळी ती म्हणाली, ‘‘सौ. सावित्री इचलकरंजीकर या साधिकेलाही प.पू. गुरुदेवांनी नृत्याचा सराव चालू करण्याचा निरोप पाठवला आहे.’’ ताईचे बोलणे ऐकताच मला प.पू. गुरुदेवांप्रती कृतज्ञता वाटली. ‘त्यांच्या संकल्पाने सगळे आपोआप होत असल्याची त्यांनी प्रचीतीच दिली’, हे माझ्या लक्षात आले.

२ ई. गीतातूनही भावजागृती होऊन आनंदाची स्थिती अनुभवणे : २१.१.२०१७ या दिवशी रात्री मी खोलीत अनेक भक्तीगीते म्हटली. त्यातील ‘श्रावणात घननिळा बरसला…’ हे भक्तीगीत म्हणत असतांना मला कृष्णाचे अस्तित्व जाणवत होते. या वेळी मी भावावस्था अनुभवली. ‘ऋतु हिरवा, ऋतु बरवा…’ हे गीत गात असतांना मनात ईश्‍वराच्या सृष्टी-निर्मितीचे विचार येऊन आनंदाची प्रचीती आली. (‘एकदा परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले होते, ‘‘सौ. अनघाला (लहान बहिणीला) संगीत आणि नृत्य दोन्हीही येते. त्यामुळे ती दोन्हींतील भेदाचा अभ्यास चांगल्या प्रकारे करू शकेल. त्यांनी सांगितल्याप्रमाणेे तिचा संगीत आणि नृत्य यांचा अभ्यास आपोआपच चालू होऊन त्यांच्या संकल्पाचा प्रत्यय आला.’ – कु. तेजल)

३. गीत गातांना आणि नृत्य केल्यावर अनुभवलेली स्थिती

३ अ. गीत म्हणणे : गाणे म्हणतांना शांतता आणि भावावस्था अधिक अनुभवली. साधारण १ घंटा ही अवस्था टिकली.

३ आ. नृत्य करणे : नृत्य केल्यानंतर दुसर्‍या दिवशीही मला उत्साह वाटत होता. एका साधकाने मला ‘‘आज तुम्ही आनंदी दिसत आहात’’, असे म्हटले.

‘संगीत’ ही आकाशतत्त्वाची साधना असल्याने त्या वेळी भावावस्था आणि शांतता जाणवली. दोन्हींत अनुभवलेला फरक योग्य आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

४. सद्यस्थितीत नृत्याविषयी येत असलेले अनुभव

अ. मनात कोणत्याही वेळी नृत्य करण्याचे विचार येतात.

आ. नामजपाला बसल्यावर प.पू. गुरुदेवांसमोर मानस नृत्य केले जाते.

इ. नृत्य करतांना मला देहभान विसरायला होते.

हे सर्व प.पू. गुरुदेवांच्या कृपेने आपोआप घडत असल्याची प्रचीती मला येत आहे. भगवंता, या जिवाला तू माध्यम बनवलेस, यासाठी तुझ्या चरणी अनंत कोटी कृतज्ञता !’

– सौ. अनघा जोशी (पूर्वाश्रमीची कु. मीनल अशोक पात्रीकर), सनातन आश्रम, देवद, पनवेल.

साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती !

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’तील ईश्‍वरप्राप्तीसाठी नृत्यकलेचा अभ्यास अन् त्याविषयीचे संशोधनकार्य यांत सहभागी होऊन साधनेच्या सुवर्णसंधीचा लाभ घ्या !

हिंदु धर्मात सांगितलेल्या १४ विद्या आणि ६४ कला ही हिंदु धर्माने विश्‍वाला दिलेली अनमोल देणगी आहे. मात्र सद्यःस्थितीत या विद्या अन् कला यांपैकी बहुतांश लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत आणि ज्या काही प्रमाणात उपलब्ध आहेत, त्यांची जीवनाभिमुखता अन् ‘ईश्‍वरप्राप्ती’ हा त्यांचा मूळ उद्देश यांपासून त्या पुष्कळ दूर गेल्याचे आढळत आहे. या पार्श्‍वभूमीवर परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी स्थापन केलेल्या ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’त या विद्या आणि कला यांचा अधिकाधिक अभ्यास अन् संपूर्ण मानवजातीस उपयुक्त होण्याच्या दृष्टीने त्यांविषयी संशोधन करण्याचे प्रस्तावित आहे. ज्यांना विविध कलांच्या माध्यमांतून साधना करावयाची असेल, त्यांना ते विषय शिकवले जातील. नृत्यकलेचा उपरोल्लेखित उद्देशांनी अभ्यास आणि संशोधन करण्यासाठी त्यासंबंधीची आवड असणार्‍या अन् नृत्यकलेचे रीतसर शिक्षण घेतलेल्या व्यक्ती; स्वतः शिक्षण न घेतलेल्या, पण या कलेतील अधिकारी व्यक्तींचे साहाय्य मिळवून देऊ शकणार्‍या व्यक्ती; तसेच विविध नृत्यशैलींची माहिती देणारी पुस्तके, कात्रणे, लिखाण आदी उपलब्ध करून देऊ शकणारे यांनी कु. तेजल पात्रीकर यांना पुढील पत्त्यावर संपर्क साधावा. अन्य आश्रमांतील, तसेच प्रसारसेवा करणार्‍या साधकांनी त्यांच्या उत्तरदायी साधकांद्वारे संपर्क करावा.

– ‘भगवतीकृपा अपार्टमेंट्स’, एस्-१, दुसरा मजला, बिल्डिंग ए, ढवळी, फोंडा- गोवा ४०३ ४०१.

दू.क्र. ९५६१५७४८२४, ७९७२४४८९०२

ई-मेल : [email protected]

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या विश्‍वकल्याणार्थ चालू असलेल्या ज्ञानयज्ञात साहाय्य करणार्‍यांची त्या साहाय्यातून एक प्रकारे साधनाच होणार आहे. आपण केलेल्या साहाय्याविषयी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय’ आपले नेहमीच कृतज्ञ राहील.

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

 

 

 

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now