एखाद्या ऑनलाईन खेळासाठीही सरकारलाच दोषी ठरवणार का ? – उच्च न्यायालय

मुंबई – आपली मुले कुठे जातात ? काय करतात ? याकडे लक्ष ठेवणे हे पालकांचे दायित्व आहे. बर्‍याचदा विद्यार्थी हे शाळा-महाविद्यालयाच्या नावाखाली मरिन ड्राईव्ह किंवा वरळी समुद्र किनार्‍यावर बसून असतात. एखाद्या ‘ऑनलाईन’ गेमसाठीही सरकारलाच दोषी ठरवणार का ? असा प्रश्‍न मुंबई उच्च न्यायालयाने केला आहे.

जीवघेणा ऑनलाईन गेम ‘द ब्ल्यू व्हेल’च्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रविष्ट करण्यात आली होती. ‘सिटीझन सर्कल फॉर सोशल वेलफेअर अण्ड एज्युकेशन’ या सेवाभावी संस्थेच्या वतीने ही याचिका करण्यात आली. याचिकाकर्त्यांनी या याचिकेत गुगल, फेसबुक, याहू यांच्यासह मुंबई पोलिसांच्या सायबर सेललाही प्रतिवादी बनवले आहे. या संदर्भात न्यायालयाने वरील वक्तव्य केले आहे.

केंद्र सरकारनेही नुकतेच हा संपूर्ण ऑनलाईन गेम देशभरात ‘ब्लॉक’ करण्याचे निर्देश दिले आहेत; मात्र इंटरनेटवर एखाद्या गोष्टीला संपूर्णपणे तात्काळ बंद करणे हे तितकसे सोपे नाही.


Multi Language |Offline reading | PDF