म्यानमारमधील रोहिंग्या आतंकवाद्यांवरील कारवाईचे भारतातील इमाम आणि मौलाना यांना दुःख

रोहिंग्या आतंकवाद्यांवरील कारवाईचा विरोध का केला जातो ? भारतातील मौलानांना आतंकवाद हवा आहे का ?

काश्मीर, पाक आणि बांगलादेश येथील हिंदूंवरील अत्याचारांविषयी भारतातील मुसलमान नेत्यांनी कधी दुःख व्यक्त केले आहे का ?

पाकपुरस्कृत आतंकवाद्यांवर कारवाई केली, तर काश्मीरमधील मशिदींतून सैन्यावर दगडफेक केली जाते, हे लक्षात घ्या !

नवी देहली – म्यानमारमध्ये गेल्या काही दिवसांपासून रोहिंग्या आतंकवाद्यांच्या विरोधात देशाच्या सैन्याकडून कारवाई केली जात आहे. त्यामुळे सहस्रो रोहिंग्यांनी तेथून पलायन करून बांगलादेशमध्ये शरणागती पत्करली आहे. तसेच भारतातही ४० सहस्र रोहिंग्या रहात आहेत. रोहिंग्यावरील कारवाईवरून भारतातील इमाम, मौलवी आणि मुसलमान संस्थांचे पदाधिकारी यांनी दुःख व्यक्त केले आहे. (रोहिंग्या आतंकवाद्यांनी म्यानमारच्या राखीन प्रांतातील ३० पोलीस ठाण्यांवर एकाच वेळी सशस्त्र आक्रमण केल्यावर सैन्याने कारवाई चालू केली आहे. अशा वेळी त्यांच्याविषयी दुःख व्यक्त करणारे आतंकवादाचे समर्थन करत आहेत ! अशांवर भारत सरकारने कारवाई केली पाहिजे अन्यथा हेच नंतर भारतात आतंकवादी कारवाया करतील ! – संपादक)

(म्हणे) ‘रोहिंग्या मुसलमानांवर होणारा अत्याचार मानवतेसाठी लज्जास्पद !’ – शाही इमाम सय्यद अहमद बुखारी, जामा मशीद, देहली

भारतात आणि इस्लामी देशांत हिंदूंवर होणारा अत्याचार हा मानवतेसाठी गौरवास्पद असतो का ? त्याविषयी इमाम का बोलत नाहीत ?

रोहिंग्या मुसलमानांवर होणारा अत्याचार मानवतेसाठी लज्जास्पद आहे. केंद्र सरकारकडून आम्ही अपेक्षा करतो की, ते मानवतेच्या अंतर्गत म्यानमार सरकारवर दबाव आणतील आणि त्यातून हा अत्याचार थांबला जाईल. भारत शेकडो वर्षांपासून विदेशी लोकांना साहाय्य करत आला आहे, अशा वेळी रोहिंग्या मुसलमानांच्या संदर्भातही ती परंपरा भारत कायम ठेवील.

म्यानमारमध्ये संयुक्त राष्ट्र संघाने हस्तक्षेप करावा ! – मौलाना मुफ्ती मुकर्रम, इमाम, फतेहपुरी मशीद, देहली

म्यानमारमध्ये रोहिंग्या मुसलमानांवर सरकार अत्याचार करत आहे आणि जग शांत आहे. (सिरिया, इराक, अफगाणिस्तान येथे इसिसकडून मुसलमानांवरच अत्याचार केले जात आहेत त्याविषयी भारतासहित जगभरातील मुसलमान शांत आहेत, याविषयी मौलाना का बोलत नाहीत ? – संपादक) म्यानमारमध्ये उघडपणे मानवाधिकारांचे उल्लघंन हात आहे आणि संयुक्त राष्ट्रे; गप्प आहेत. (काश्मीरमध्ये ३ दशकांपूर्वीच असेच मानवाधिकारचे उल्लंघन करून हिंदूंचा वंशसंहार करण्यात आला, लाखो हिंदूंना पलायन करावे लागले त्याविषयीही संयुक्त राष्टे्र आणि भारतातील मुसलमान गप्प आहेत ! – संपादक) वास्तविक त्यांनी यात हस्तक्षेप केला पाहिजे, त्यामुळे येथे शांतता प्रस्थापित होईल. भारतात रहाणार्‍या रोहिंग्या मुसलमानांना समस्या सुटल्यावरच म्यानमारमध्ये पाठवले पाहिजे. त्यापूर्वीच त्यांना म्यानमारमध्ये पाठवणे मानवतेच्या विरुद्ध असेल. (मानवतेचा कळवळा असलेल्यांना केवळ त्यांचे धर्मबंधूंच दिसतात अन्य धर्मियांवरील अत्याचाराच्या वेळी किंवा त्यांच्या धर्मियांकडून अन्य धर्मियांवर करण्यात येणार्‍या अत्याचाराच्या वेळी त्यांना मानवता आठवत नाही ! – संपादक)

म्यानमार सरकार अत्याचारी झाले आहे ! – मौलाना कल्बे रुशैद, शिया धर्मगुरु

रोहिंग्या मुसलमानांच्या संदर्भात म्यानमारमधील सरकार अत्याचारी झाले आहे. (म्यानमार रोहिंग्या आतंकवाद्यांवर कारवाई करत आहे आणि कोणत्याही देशाने त्याच्या सुरक्षेसाठी आतंकवाद्यांवर कारवाई केलीच पाहिजे ! उलट भारत अशी कारवाई करत नाही, हे खेदजनकच आहे ! – संपादक) या प्रकरणी सौदी अरेबियाचे मौन समजण्याच्या पलीकडचे आहे. सौदी अरेबिया ज्यांना तेल देतो त्यांचे हात मुसलमान बांधवांच्या रक्ताने माखलेले आहेत. (सौदी अरेबियाला म्यानमारमध्ये रोहिंग्यांनी चालवलेला अत्याचार ओळखता आला, म्हणून तो गप्प आहे ! – संपादक) सौदी अरेबियाने त्याची विदेश नीती पालटली असल्याने तो गप्प आहे, असेच आता वाटत आहे.

आंग सान सू यांना दिलेला नोबल पुरस्कार परत घ्यावा ! – कमाल फारुकी, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड

म्यानमारच्या प्रमुख आंग सान सू यांना देण्यात आलेले शांततेसाठीचे नोबल पुरस्कार परत घेतले पाहिजे. कारण आज त्या शांतीच्या विरोधात कृत्य करत आहेत. भारतात रोहिंग्यांना धर्माच्या दृष्टीने पाहिले जात आहे. त्यांच्याविषयी किरेन रिजिजू यांचे विधान लज्जास्पद आहे. (किरेन रिजिजू यांना १२५ कोटी जनतेचे कल्याण पहायचे आहे; त्यामुळे ते नियमाला धरूनच विधाने करत आहेत. त्यात लज्जास्पद काय नाही. – संपादक) भारतीय संस्कृती नेहमीच पीडितांना साहाय्य करणारी राहिली आहे. श्रीलंकेतून तमिळ आल्यावर आणि अफगाणिस्तानमधून अफगाणी आल्यावर भारताने त्यांना स्वीकारले. बांगलादेशमधून आलेल्या हिंदूंना भारत नागरिकत्व देत आहे; मात्र रोहिंग्याना परत पाठवले जात आहे. (कोणाला आश्रय द्यायचा आणि कोणाला नाही हे ठरवण्याचा अधिकार देशाच्या लोकनियुक्त शासनाचा आहे. तेथे शासनाला दोष देण्यात शहाणपणा नाही – संपादक)

रोहिंग्यांना परत पाठवणे आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विरुद्ध ! – सलीम इंजीनिअर, सरचिटणीस, जमात-ए-इस्लामी हिंद

आम्हाला अपेक्षा होती की, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्यानमारशी रोहिंग्यांविषयी बोलतील; मात्र त्यांनी आम्हाला निराश केले. म्यानमारशी भारताचे जुने संबंध आहेत. अशा वेळी भारतच ही समस्या सोडवू शकतो. भारतात मोठ्या संख्येने रोहिंग्या रहात आहेत. मात्र काही कट्टरतावादी त्यांना बाहेर काढण्याची भाषा करत आहेत. मात्र आंतरराष्ट्रीय कायदा आणि मानवता हे दोघेही याला अनुमती देत नाहीत. (आंतरराष्ट्रीय कायदे आणि मानवता या सूत्रांविषयी भारतीय शासनाचे प्रबोधन करण्याची आवश्यकता असण्याइतपत ते दुबळे आहे का ? – संपादक)

अन्य धर्मियांनी अत्याचार केल्यावर रडता; मात्र मुसलमानांनीच तुमच्यावर अत्याचार केल्यावर मौन का बाळगता ? – तस्लीमा नसरीन यांचे रोहिंग्यांच्या प्रकरणी ट्वीट

तस्लीमा नसरीन यांच्यासारखे परखड विचार देशातील एकतरी पुरो(अधो)गामी विचारवंत, लेखक मांडतात का ?

नवी देहली – रोहिंग्यांच्या प्रकरणी निर्वासित बांगलादेशी लेखिका तस्लीमा नसरीन यांनी एका ट्वीटद्वारे टीका केली आहे. त्यांनी लिहिले आहे की, ‘मुसलमान त्या मुसलमानांसाठी रडतात, जे मुसलमानेतरांच्या अत्याचाराला बळी पडतात; मात्र मुसलमान तेव्हा रडत नाहीत, जेव्हा मुसलमानच मुसलमानांवर अत्याचार करतात.’ तस्लीमा यांनी हे ट्वीट म्यानमारमध्ये रोहिंग्या आतंकवाद्यांच्या विरोधात होत असलेल्या सैनिकी कारवाईचा मुसलमानांकडून होत असलेला विरोध यावर असल्याचे म्हटले जात आहे. सिरीया, अफगाणिस्तान, पाकिस्तान या देशांमध्ये मुसलमांकडूनच होणार्‍या मुसलमानांवरील अत्याचारांवर मुसलमान गप्प रहातात, यावर त्यांनी ही टीका केली आहे. त्यांच्या या ट्वीटचे अनेकांनी समर्थन केले आहे.


Multi Language |Offline reading | PDF