सीतापूर (उत्तरप्रदेश) येथे धर्मांधांकडून हिंदु तरुणाची हत्या !

नक्षल समर्थक गौरी लंकेश यांच्या हत्येवरून छाती पिटणारे पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी यांना धर्मांधांकडून मारल्या जाणार्‍या हिंदूंविषयी केव्हा दुःख वाटणार ?

देशातील अनेक गावांत धर्मांधांकडून हिंदूंवर आक्रमण करून त्यांना ठार मारले जाते; मात्र देशभरातील हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि पक्ष याविषयी आवाज उठवत नाहीत !

उत्तरप्रदेशात हिंदूंच्या हत्या होऊ नयेत, असेच हिंदूंना वाटते, हे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लक्षात घ्यायला हवे !

सीतापूर (उत्तरप्रदेश) – येथील रामपूर मथुरा पोलीस ठाण्याच्या सीमेमधील कटरा गावामध्ये काही धर्मांधांनी बलराम लोधी या ३० वर्षीय व्यक्तीची मारहाण करून हत्या केली. लोधी बाराबंकी येथून सायकलवरून त्याच्या बहिणीच्या घरी जात असतांना धर्मांधांनी त्याला रोखले आणि मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाला. यानंतर येथे झालेल्या तणावानंतर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. लोधी कटरा गावातील कासिम याच्या घरासमोरून जात असतांना येथे उभ्या असलेल्या ५-६ धर्मांध युवकांनी त्याचा रस्ता रोखला. त्या वेळी त्यांच्यात वाद झाला आणि नंतर या युवकांनी लोधी याला मारहाण केली.


Multi Language |Offline reading | PDF