(म्हणे) ‘केंद्र सरकार फुटीरतावाद्यांवर किती अन्याय करणार !’ – फारुख अब्दुल्ला

फुटीरतावाद्यांविषयी कळवळा असलेले फारुख अब्दुल्ला ! फुटीरतावाद्यांची कड घेणारे फारुख अब्दुल्ला यांना देशद्रोही म्हणण्यापलीकडे दुसरी संज्ञा नाही.

श्रीनगर – मी एन्आयए आणि भारत सरकार यांना विचारू इच्छितो की, तुम्ही फुटीरतावाद्यांवर आणखी किती अन्याय करणार ?, अशी टीका आतंकवाद्यांना पैसे पुरवल्याच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्आयएने) काश्मीरमध्ये फुटीरतावाद्यांवर नुकत्याच घातलेल्या धाडींचा विरोध करतांना नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी केली आहे.

अब्दुल्ला म्हणाले की, या धाडींमधून काही निष्पन्न होईल, तेव्हाच मी एन्आयएला मानीन. जर या धाडी केवळ फुटीरतावाद्यांना घाबरवण्यासाठी असतील, तर हे चुकीचे आहे. केंद्र सरकारने फुटीरतावादी नेत्यांना एकटे सोडण्याची आवश्यकता आहे. (म्हणजे ते काश्मीरमध्ये हवे ते करू शकतील ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF