भारतात येण्याआधी तुमच्या देशात गोमांस खाऊन या !

पर्यटनमंत्री अल्फॉन्स कन्ननथानम् यांचा विदेशी पर्यटकांना सल्ला

भुवनेश्‍वर (ओडिशा) – गोमांस खायचे असल्यास ते भारतात येण्याआधी स्वदेशातूनच खाऊन या, असा सल्ला केंद्रीय पर्यटनमंत्री अल्फॉन्स कन्ननथानम् यांनी परदेशी पर्यटकांना दिला आहे. अनेक राज्यांमध्ये गोमांसावर बंदी आहे. यावरून अल्फॉन्स यांना एक प्रश्‍न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी वरील उत्तर दिले. (असा सल्ला देणारे पर्यटनमंत्री देशाला लाभणे हे खेदजनक ! – संपादक) काही दिवसांपूर्वीच ‘केरळचे लोक गोमांस खाऊ शकतात’, असे विधान अल्फॉन्स यांनी केले होते. पत्रकारांनी अल्फॉन्स यांना त्यांच्या या विधानाविषयी विचारले. यावर ते म्हणाले, ‘‘मी खाद्यमंत्री नाही, त्यामुळे हा निर्णय मी घेऊ शकत नाही.’’ (हे उत्तर आधी का दिले नव्हते ? – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF