स्वेच्छाविवाह ‘लव्ह जिहाद’ नाही !

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाचा निर्णय

हिंदु युवतींना स्वधर्माचे महत्त्व लक्षात येण्यासाठी त्यांना धर्मशिक्षण देण्याला पर्याय नाही !

नागपूर – येथील एका हिंदु मुलीशी एका मुसलमान मुलाने पसार होऊन इस्लामी पद्धतीने विवाह केला होता. या प्रकरणी पोलिसांनी त्या मुलीला प्रथम नारी निकेतनमध्ये पाठवले आणि त्यानंतर त्या मुलीचे कुटुंबीय तिला घरी घेऊन गेले. त्यामुळे त्या मुसलमान मुलाने पोलिसांनी केलेल्या अवैध कारवाईविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात याचिका प्रविष्ट केली. त्या प्रकरणी मुलीच्या पालकांनी ‘हा प्रकार ‘लव्ह जिहाद’चा असून संपूर्ण प्रकरणाचा तपास त्या अंगाने करण्यात यावा’, अशी मागणी करणारे मध्यस्थी आवेदन न्यायालयात प्रविष्ट केले. या खटल्याच्या सुनावणीच्या वेळी त्या मुलीने ‘आपण स्वखुशीने लग्न केले असून यामध्ये कुठल्याही प्रकारची फसवेगिरी नाही’, असे न्यायालयात लिहून दिले. त्यामुळे न्यायालयाने मुलीचे म्हणणे ग्राह्य धरत ‘दोघेही सज्ञान असून त्यांनी स्वेच्छेने लग्न केल्यामुळे या प्रकरणाला ‘लव्ह जिहाद’ म्हणता येणार नाही’, असा निर्णय दिला.


Multi Language |Offline reading | PDF