अबू सालेम आणि करीमुल्ला खान यांना जन्मठेप, तर अन्य दोघांना फाशीची शिक्षा

मुंबईतील वर्ष १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी महत्त्वपूर्ण निकाल

गुन्हेगारांना २४ वर्षांनी शिक्षा होणे, हे आतापर्यंतच्या शासनकर्त्यांना लज्जास्पद !

अबू सालेम याला न्यायालयाने वरील शिक्षा सुनावली, त्या वेळी सालेमला कोणताही पश्‍चात्ताप झाला नाही. उलट शिक्षा सुनावल्यावर तो हसत होता.

(यावरूनच धर्मांध आतंकवादी जिहादच्या नावाखाली भारताच्या मुळावर उठले आहेत आणि त्यांना भारतीय कायद्याचा धाक नाही, हेच दिसून येते ! – संपादक)

मुंबई – येथे वर्ष १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट खटल्यातील दुसर्‍या टप्प्याचा निकाल २४ वर्षांनंतर लागला. (एवढ्या उशिरा लागलेला निकाल हा एकप्रकारे अन्यायच म्हणावा लागेल. हा निकाल लवकर लागण्यासाठी शासनाने प्रयत्न करणे अपेक्षित होते ! – संपादक) या प्रकरणात दोषी ठरलेले आरोपी फिरोज खान आणि ताहीर मर्चंट ऊर्फ ताहीर टकल्या यांना विशेष टाडा न्यायालयाने फाशी, तर कुख्यात गुंड अबू सालेम आणि करीमुल्ला खान यांना जन्मठेपेची शिक्षा अन् प्रत्येकी २ लक्ष रुपयांचा दंडही ठोठावला आहे, तसेच रियाज अहमद सिद्दिकी याला १० वर्षांची शिक्षा ठोठावली.

१. १२ मार्च १९९३ ला मुंबईमध्ये एक पाठोपाठ एक असे सलग १२ बॉम्बस्फोट झाले होते. या स्फोटात तब्बल २५७ लोक मृत्यूमुखी पडले होते, तर ७०० पेक्षा अधिक लोक गंभीर घायाळ झाले होते.

२. सालेम याला बॉम्बस्फोट घडवून आणण्याचे षड्यंत्र रचणे आणि पाकिस्तानातून भारतात आलेला शस्त्रसाठा गुजरातहून मुंबईत पाठवणे या दोन्ही प्रकरणी, तसेच बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी रायगड जिल्ह्यातील दिघी आणि शेखाडी बंदरावर स्फोटके उतरवल्याप्रकरणी करीमुल्ला याला न्यायालयाने दोषी ठरवले आहे.

३. पोर्तुगालकडून फाशीची शिक्षा न देण्याच्या अटीवर म्हणजे प्रत्यार्पण करारानुसार सालेम आणि करीमुल्ला यांना फाशीची शिक्षा ठोठावता येत नसल्याने जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्याची मागणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआयने) केली होती. त्यानुसार टाडा न्यायालयाने ही शिक्षा सुनावली. अबू सालेमने १२ वर्षांची शिक्षा भोगली असून अजून तो १३ वर्षे कारागृहात असणार आहे. प्रत्यार्पण कायद्यानुसार २५ वर्षांहून अधिक काळ त्याला कारागृहवासाची शिक्षा होऊ शकत नाही. (गुन्हेगारांनी परदेशात पळून जाऊन अशा प्रकारे अपलाभ उठवणे, हे भारतीय कायदा-सुव्यवस्थेचे अपयशच ! – संपादक)  भारत शासनाने आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न केल्यास अबू सालेम याला आजन्म जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. (भारतीय शासनकर्त्यांनी इच्छाशक्ती दाखवून तत्परतेने कृती करावी, ही राष्ट्रप्रेमींची अपेक्षा आहे ! – संपादक)

४. या प्रकरणातील एक आरोपी मुस्तफा डोसा याला न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर काहीच दिवसांनी त्याचा मृत्यू झाला होता.


Multi Language |Offline reading | PDF