(म्हणे) ‘सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या विरोधात थेट उभे रहाण्याची आवश्यकता आहे !’ – लोकमतचे संपादक राजू नायक यांची चिथावणी

पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या निषेधार्थ गोेवा पत्रकार संघटनेकडून निदर्शने

हिंदुत्वनिष्ठांना अपकीर्त करण्यासाठी मिळेल ती संधी साधायची, ही कम्युनिस्टांची नेहमीचीच खेळी आहे. कर्नाटकासह दक्षिण भारतात चालू असलेल्या ‘सदर्न जिहाद’च्या नावाखाली हिंदुत्वनिष्ठांना लक्ष्य करून केल्या जात असलेल्या हत्यांविषयी हे तथाकथित पुरोगामी मूग गिळून गप्प का आहेत ? हिंदूंच्या हत्यांवर मौन बाळगून कम्युनिस्टांच्या हत्यांवर गदारोळ करणे, हे दांभिक पुरोगामित्व होय !

पणजी, ७ सप्टेंबर (वार्ता.) – बेंगळुरू येथील पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या निषेधार्थ गोवा पत्रकार संघटनेने आझाद मैदानात ६ सप्टेंबर या दिवशी आयोजित केलेल्या निदर्शनांमध्ये ‘दैनिक लोकमत’च्या गोवा आवृत्तीचे संपादक राजू नायक यांनी सनातनच्या विरोधात गरळओक करून सनातनच्या विरोधात पत्रकारांना भडकवण्याचा प्रयत्न केला. ‘गोव्यात सनातनी शक्ती माजली आहे. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती या दोन्ही एकच संघटना आहेत. त्याच्या विरोधात थेट उभे रहाण्याची आवश्यकता आहे’, असे विधान राजू नायक यांनी केले. (धादांत खोटे आरोप करून सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांची नाहक अपकीर्ती करणारे राजू नायक यांच्यावर कायदेशीर कारवाई होण्यासाठी सनातन आणि समिती अधिवक्त्यांचा सल्ला घेत आहेत ! – संपादक)

या वेळी ‘गोवन ऑब्झर्व्हर’चे संपादक राजन नारायण, प्रवीण सबनीस आणि धर्मद्रोही रमेश गावस यांनीही हिंदुत्वनिष्ठांवर टीका केली आहे.

सनातनविरोधी गरळओक करतांना राजू नायक म्हणाले,

१. गोव्यातील एका सनातनी संस्थेने माझ्यावर ५ खटले दाखल केले आहेत. अशाप्रकारे एखाद्यावर ५ खटले दाखल करण्यात आले, तर एखादा माणूस काम करणार कि खटल्यासाठी दिवसभर तिथे (न्यायालयात) जाऊन बसणार ? त्यामुळे यापुढे काहीही लिहू नये, असे वाटू लागते. अशा प्रवृत्ती गोव्यात माजल्या आहेत.

२. आम्ही एक संघटना म्हणून आणि लोकांचा आवाज म्हणून आवाज उठवत नसल्याने अशा अपप्रवृत्ती माजल्या आहेत. त्यांच्या विरोधात आम्ही एकत्र येणार कि नाही, हा प्रश्‍न आहे. संघटित होऊन या विरोधात सतत आवाज उठवून मशाल धगधगत ठेवणे आवश्यक आहे. असे केल्यास या शक्तींना धाक बसेल.

३. विचारवंतांच्या पाठीशी पत्रकार आणि त्यामागे सामान्य जनता, अशी ही रचना आहे. अशाप्रकारे आक्रमणे झाल्यास ‘आम्ही सगळे एक आहोत’, हा संदेश त्यांच्यापर्यंत (सनातन प्रवृत्तींच्या) पोहोचला पाहिजे. सनातनी शक्तीच्या पाठीमागे महाराष्ट्र्रवादी गोमंतक पक्षाचे पुढारी आहेत. याविषयी आपण उघडपणे बोलायला हवे. त्यांची नावे घोषित करण्याचे दायित्व जर पत्रकारांनी योग्यरित्या पार पाडले, तर या सर्वांमध्ये भय निर्माण होईल.

४. आज एकवटलेली ही शक्ती पुढे वाढत गेली पाहिजे. त्यासाठी कार्यकर्ते, पत्रकार आणि समविचारी सामाजिक संघटनांनी जर प्रयत्न केला, तर काही प्रमाणात तरी भीती निर्माण होईल. यासाठी मडगावात मी दक्षिणायन परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेस पूर्ण देशातील लोकांची उपस्थिती होती; पण दुर्दैवाने गोव्यातील लोकांनी अतिशय अल्प प्रतिसाद दिला. अशा वाईट प्रवृत्ती गोव्यात निर्माण झाल्या आहेत आणि आम्ही गप्प बसलो आहोत, असे होऊ नये, यासाठी सर्वांनी संघटित झाले पाहिजे.’’

‘गोवन ऑब्झर्वर’चे संपादक राजन नारायण या वेळी म्हणाले,

१. ‘‘सनातन संस्थेने केवळ फोंडा न्यायालयात वृत्तपत्रांविरोधात ५० खटले दाखल केले आहेत. अशा पद्धतीने पत्रकारांना धमकावण्याचे प्रकार चालू आहेत.’’ (न्यायालयात दावे दाखल करणे म्हणजे धमकावणे, असा नवीन शोध लावून स्वतःचेच हसे करून घेणारे संपादक राजन नारायण ! सनातनच्या विरोधात सातत्याने धादांत खोटे आरोप करून सनातनची नाहक अपकीर्ती केल्यामुळेच हे दावे दाखल केले आहेत. सनातनचे सर्व कार्य वैध मार्गानेच असल्यामुळे अपकीर्तीच्या विरोधात कायदेशीर मार्गाने सनातन लढत आहे, हेही लक्षात न येणारे पत्रकार जनतेला कोणती दिशा देणार ? – संपादक )

२. इंग्रजीचे शिक्षक असलेल्या गौरी लंकेश यांचे वडील पी. लंकेश यांचा मी विद्यार्थी आहे. वर्ष १९६०-७० च्या दशकात पी. लंकेश यांनी आम्हा विद्यार्थ्यांवर निधर्मीवादाचे संस्कार केले. गौरी लंकेश यांच्याशी माझे जवळचे संबंध होते.

३. ज्या पद्धतीने पानसरे, दाभोलकर आणि कलबुर्गी यांना मारले, तीच पद्धत गौरी हिला मारण्यासाठी वापरली आहे. पहिल्या तीन ‘नॅशनलिस्ट’ची हत्या झाल्यानंतर महाराष्ट्र पोलिसांनी विशेष तपासणी पथक स्थापन करून चौकशी केली. त्यातून संशयाची सूई सनातन संस्थेकडे वळली. त्यांनी सनातन संस्थेवर बंदी घालण्याची सूचना महाराष्ट्र्र सरकारला केली. सध्या हे प्रकरण महाराष्ट्र शासनाच्या विचाराधीन आहे.

४. सनातन संस्थेचे मुख्यालय गोव्यात आहे. मला वाटते ‘गोव्यातील प्रसारमाध्यमे, गोव्यातील समाज वारंवार सनातन संस्थेवर बंदी कधी घालणार’, असे विचारत आहे. सनातन संस्थेने वर्ष २००८ मध्ये माझ्या विरोधात एक खटला प्रविष्ट केला आहे. प्रज्ञा गावकर या आमच्या महिला पत्रकाराने सनातनच्या वतीने चालवल्या जाणार्‍या स्वसंरक्षण प्रशिक्षणाविषयी माहिती दिली होती. सनातनच्या एका पुस्तकात असलेली ‘त्रिशूळ’ आणि ‘एअरगन’ कशी चालवायची यांविषयीची रेखाचित्रे आम्ही प्रसिद्ध केली होती. दुर्जनांपासून रक्षण करण्यासाठी हे प्रशिक्षण दिले जाते होते, असा दावा या संस्थेने केला होता.

५. सनातन संस्थेची स्वत:ची संकुचित हिंदुत्वनिष्ठ विचारसरणी आहे. जो या संकुचित विचारसरणीला विरोध करतो, तो त्यांचा शत्रू आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास नरकासुराचे आहे. सनातनच्या तत्वज्ञानानुसार नरकासुरापेक्षा श्रीकृष्णाची पूजा करावी. याच विचारसरणीमुळे मडगावातील नरकासुर उत्सवावर त्यांनी आक्रमण केले. सुदैवाने लोकांना काही झाले नाही.

६. सनातन संस्थेने अवमान याचिका दाखल करून गोव्यातील प्रत्येक संपादकाची सतावणूक केली आहे. राजू नायक यांच्या विरोधात कितीतरी याचिका आहेत. ‘गोवन ऑब्झर्वर’च्या विरोधात त्यांनी फौजदारी आणि दिवाणी अशा दोन्ही प्रकारच्या याचिका प्रविष्ट केल्या होत्या. यातील फौजदारी याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. दिवाणी याचिका फोंड्याच्या न्यायालयात चालू आहे. गेल्या मासात मी ‘व्हीटनेस बॉक्स’मध्ये उभा होतो. तेव्हा ‘फोंड्यातील या न्यायालयात किमान ५० अवमानकारक याचिका सनातन संस्थेने प्रविष्ट केल्या आहेत. या याचिका पत्रकार, समाजकार्यकर्ते यांच्या विरोधात आहेत. म्हणून मला वाटते पत्रकारांनी शिष्टमंडळ बनवून उच्च न्यायालयात जायला हवे. तेथे सनातन संस्थेने निष्कारण याचिका दाखल केल्याचे गांभीर्याने निदर्शनास आणून द्यायला हवे.’


Multi Language |Offline reading | PDF