गौरी लंकेश यांच्या हत्येच्या मागे नक्षलवादीही असण्याची शक्यता ! – इंद्रजित लंकेश यांना संशय

नवी देहली – बेंगळुरू येथे हत्या करण्यात आलेल्या पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचे अन्वेेषण प्रत्येक दिशेने झाले पाहिजे, मग ती नक्षलवादी संघटना असो कि हिंदुत्वनिष्ठ, असे त्यांचे भाऊ इंद्रजित लंकेश याने म्हटले आहे. गौरी यांना त्यांच्या जिवाला धोका असल्याचे आधीच लक्षात आले होते, असेही ते म्हणाले. गौरी लंंकेश नक्षल समर्थक होत्या, तसेच त्या नक्षलवाद्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करत होत्या. त्या कर्नाटक सरकारच्या सहकार्याने या संदर्भात कार्य करत होत्या.

इंद्रजित यांनी असेही सांगितले की, त्यांना सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नक्षलवाद्यांनी अशी पत्रके छापली आहेत ज्यात त्यांच्या सहकार्‍यांना मुख्य प्रवाहात जाण्याचा प्रयत्न करणार्‍यांना चेतावणी दिली आहे.


Multi Language |Offline reading | PDF