थेरगाव (पुणे) येथील पवना नदीत विसर्जित केलेल्या १ सहस्र ५०० श्री गणेशमूर्ती बाहेर काढल्या

नदीप्रदूषण रोखण्याच्या नावाखाली स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचा उपक्रम

कारखान्यांतून सोडण्यात येणारे सांडपाणी आणि अन्य माध्यमांतून वर्षभर नद्या प्रदूषित होत असतांना अशी मोहीम कधी राबवली जाते का ?

श्री गणेशमूर्ती नदीतून बाहेर काढतांना कार्यकर्ते

पुणे – चिंचवड येथील थेरगाव पुलाशेजारी पवना नदीमध्ये अनेक गणेशभक्तांनी श्री गणेशमूर्ती ५ सप्टेंबरला विसर्जित केल्या होत्या. ‘मूर्ती नदीपात्रातून बाहेर काढून त्यांचे खाणीत पुनर्विसर्जन करण्यासाठी, तसेच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींमुळे नदीचे पाणी दूषित होते, हे कारण पुढे करत स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ, इतर सामाजिक संस्था आणि अन्य मंडळे यांच्या साहाय्याने १ सहस्र ५०० हून अधिक श्री गणेशमूर्ती ६ सप्टेंबरला मानवी साखळी करून नदीच्या पाण्यातून बाहेर काढल्या. (धर्मशिक्षणाच्या अभावी जन्महिंदूंकडून केली जाणारी अयोग्य कृती ! अशांवर श्री गणेशाची कृपा कशी होईल ? ‘प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे जलप्रदूषण होत नाही, असा अहवाल सृष्टी इको रिसर्च संस्थेने दिला आहे; उलट त्यातील जिप्सम या घटकामुळे पाणी शुद्ध होते ! – संपादक) मंडळाच्या वतीने नदी स्वच्छता मोहीम राबवण्याचे यंदाचे ६ वे वर्ष आहे.

या उपक्रमात निसर्गमित्र, वृक्षवल्ली परिवार, भावसार व्हिजन, लायन्स क्लब, दत्तगड निसर्ग सेवक, पवनामैय्या जलमैत्री अभियान, इंडो सायकल क्लब, पिंपरी चिंचवड सिटीझन फोरम, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटना आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राचे कर्मचारी यांनी सहभाग घेतला.


Multi Language |Offline reading | PDF