सातारा येथे श्री गणेशमूर्ती विसर्जन अभियानाच्या निमित्ताने राबवलेल्या विविध उपक्रमांना भाविकांचा प्रतिसाद !

 सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांची आदर्श गणेशोत्सव विसर्जन मोहीम

 १.  समितीच्या कार्यकर्त्यांच्या नियोजनामुळे या वर्षी वाहतूककोंडी झाली नाही ! – भाविकांची प्रतिक्रिया

प्रसिद्धीमाध्यमांना अभियानाची माहिती देतांना समितीच्या सौ. रूपा महाडिक

समितीच्या कार्यकर्त्यांनी दिवसभर वाहनांना दिशा दाखवणे, वाहने उभी करणे या वाहतूकव्यवस्थेसाठी पोलिसांना सहकार्य केले. कृष्णातीरी सहस्रो घरगुती अणि मंडळे यांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन होत असूनही समितीच्या कार्यकर्त्यांच्या नियोजनामुळे या वर्षी वाहतूककोंडी झाली नाही, अशी प्रतिक्रिया अनेक भाविकांनी कार्यकर्त्यांजवळ व्यक्त केली. त्याविषयी अनेकांनी समितीच्या कार्यकर्त्यांचे आभारही मानले. समितीच्या कार्यकर्त्यांच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन पोलीस भाविकांना करत होते.

२. प्रथमोपचार कक्षाच्या माध्यमातून उपचार

प्रथमोपचार कक्षावर जखमी भाविकांवर उपचार करतांना आधुनिक वैद्य

समितीच्या वतीने रग्णांना त्वरित प्रथमोपचार मिळावेत, यासाठी तज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमोपचार कक्ष लावण्यात आला होता. या ठिकाणी घायाळांवर उपचार करण्यात आले. या सेवेविषयी रुग्णांनी समितीचे मनापासून आभार मानले.

३. पर्यावरण रक्षणासाठी समितीचा पुढाकार !

नदीपात्रातील पर्यावरणास हानीकारक कचरा गोळा करतांना समितीचे कार्यकर्ते

नदीपात्रात अनेक दिवसांपासून प्लास्टिकच्या पिशव्या, काचा यांसारखे पर्यावरणास हानीकारक घटक साचले असल्याचे समितीच्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आले. त्या वेळी समितीच्या कार्यकर्त्यांनी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि रोटरी क्लब सातारा या संघटनांच्या कार्यकर्त्यांना समवेत घेऊन परिसरात स्वच्छता अभियान राबवले.

४. ध्वनिक्षेपकावरून श्रीगणेशाच्या उपासनेविषयी अध्यात्मप्रसार !

समितीचे श्री. महेंद्र निकम यांनी उद्घोषणेद्वारे भाविकांना विसर्जनाचे शास्त्र सांगितले आणि श्री गणेशाचा नामजप करवून घेतला. श्री गणेशाचा भावपूर्ण नामजप ऐकल्यावर चांगले वाटल्याच्या प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली.

समितीच्या अभियानाविषयी विविध प्रतिक्रिया

१. अतिरिक्त पोलीस निरीक्षक सुभाष चौगुले – हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते दिवसभर चांगले काम करत आहेत. त्यांच्यामुळे आम्हाला साहाय्य होत आहे.

२. सौ. सीमा मुथा, रोटरी क्लब सातारा – समितीचे कार्यकर्ते दिवसभर समर्पितभावाने सेवा करत आहेत. असे आजकाल पहायला मिळत नाही. तुमच्या कार्याला सलाम.

३. संगममाहुली ग्रामपंचायतीच्या वतीने समितीने केलेल्या सेवाकार्याविषयी आभार व्यक्त करण्यात आले. तसेच समितीच्या कार्यकर्त्यांना विविध कार्यक्रमात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले.

क्षणचित्रे

१. ‘लोकवृत्त’ केबल वाहिनीने समितीच्या अभियानाचे प्रक्षेपण केले. स्थानिक केबल वाहिनी दिनमान अणि वृत्तपत्र सकाळ यांच्या वार्ताहरांनी अभियानाची माहिती संकलित करून या उपक्रमाचे कौतुक केले. समितीच्या सौ. रूपा महाडिक यांनी गणेशोत्सवाचे शास्त्र, पर्यावरण रक्षण, धर्मद्रोह्यांचा हिंदूंच्या सणांमधील वाढलेला हस्तक्षेप याविषयी वार्ताहरांनी विचारलेल्या प्रश्‍नांवरील समितीची भूमिका स्पष्ट केली. तसेच हिंदूंनी सणांचे अध्यात्मशास्त्र समजून भक्तीभावाने सण-उत्सव साजरे करावेत, असे आवाहन केले.

२. श्री. विलास कुलकर्णी आणि सौ. लीला निंबाळकर यांनी सनातन संस्थेचे सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांचा कक्ष लावला होता.

सहकार्य – संगममाहुली ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. रमेश साबळे आणि ग्रामसेवक श्री. ताठे यांनी ध्वनीक्षेपक यंत्रणा उपलब्ध करून दिली तसेच स्वयंसेवकांसाठी चहाची व्यवस्था केली.


Multi Language |Offline reading | PDF