समलैंगिक नायकाला वीर हनुमानाच्या मुद्रेत दाखवणार्‍या का बॉडीस्केप्स या चित्रपटावर बंदी घालावी !

वाराणसी येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनात धर्माभिमान्यांची मागणी

आंदोलन करतांना धर्माभिमानी हिंदू

वाराणसी – समलैंगिक नायकाला वीर हनुमानाच्या मुद्रेत दाखवून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या का बॉडीस्केप्स या मल्ल्याळम् चित्रपटावर बंदी घालावी, भारत सरकारने चिनी उत्पादनांवर बंदी घालून स्वदेशीला प्रोत्साहन देण्याची नीती स्वीकारावी यांसाठी येथील शास्त्री घाटावर नुकतेच राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला हिंदु जागरण मंचाचे श्री. शुभम मिश्रा, श्री. रवि श्रीवास्तव, हिंदु सेनेचे जिल्हाध्यक्ष पंडित शिवतपस्वी तिवारी, हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता अविनाश राय, अधिवक्ता कमलेश चंद्र त्रिपाठी आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. नीलेश सिंगबाळ यांनी संबोधित केले. या आंदोलनामध्ये हिंदुत्वनिष्ठ युवा वाहिनीचे श्री. अनुराग सिंह, हिंदु सेना युवा मोर्चाचे श्री. हेमंत मिश्रा, विश्‍व हिंदू महासंघाचे श्री. नितिन पांडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. कपिल सिंह, श्री. अभिजीत सिंह, भारतीय जनता पक्षाचेश्री. पीयूष सिंह आदी धर्माभिमान्यांनी सहभाग घेतला.


Multi Language |Offline reading | PDF