नोटाबंदीमुळे सरकारी मुद्रणालयांची ५७७ कोटी रुपयांची हानी

नवी देहली – नोटांची छपाई करणार्‍या सरकारी मुद्रणालयांनी त्यांना नोटाबंदीमुळे सुमारे ५७७ कोटी रुपयांची हानी झाल्याचे म्हटले आहे. या हानीची भरपाई देण्यात यावी, अशी मागणी मुद्रणालयांनी रिझर्व्ह बँकेकडे केली आहे. सरकारकडे नोटांची छपाई करणारी ४ मुद्रणालये आहेत. नोटाबंदीमुळे या चारही मुद्रणालयांची आर्थिक हानी झाली आहे.


Multi Language |Offline reading | PDF