म्यानमारमधील कट्टरपंथियांच्या हिंसाचारावर चिंतीत आहोत !  – पंतप्रधान मोदी

भारतातील आतंकवादी, नक्षलवादी यांच्या हिंसाचारावरही मोदी यांनी कृती करावी, अशी जनतेची अपेक्षा आहे !

नेपीतॉ (म्यानमार) – ज्या आव्हानांचा तुम्ही सामना करत आहात, त्याची आम्हाला जाणीव आहे. साहजिकच लोकांवर थेट परिणाम होतो. सर्वांनी मिळून यावर तोडगा काढायला हवा. सर्वांसाठी शांतता, न्याय आणि लोकशाही यंत्रणा कायम राहील अशी आम्ही अपेक्षा करतो, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्यानमारच्या स्टेट काऊंसलर आंग सान सू की यांची औपचारिक भेट घेतल्यावर रोहिंग्या मुसलमानांचे नाव न घेता राखीन प्रांतात चालू असलेल्या कट्टरपंथी हिंसाचारावर केले. मोदी आणि सू की यांची ही पहिलीच द्विपक्षीय भेट होती. भारतातील तुरुंगांमध्ये बंद असलेल्या म्यानमारच्या ४० कैद्यांना सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ते लवकरच आपल्या कुटुंबियांची भेट घेऊ शकतील, असेही मोदी म्हणाले.


Multi Language |Offline reading | PDF