डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे हत्या प्रकरण : तपासकर्त्यांनी अद्ययावत तंत्रज्ञान आणि कौशल्य यांचा वापर करावा ! – मुंबई उच्च न्यायालय

मुंबई – अंनिसचे डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येची चौकशी करणारी केंद्रीय अन्वेषण यंत्रणा (सीबीआय) आणि विशेष तपास पथक यांच्या तपासाला गती देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. तपासकर्त्यांनी तपासाचे पारंपरिक तंत्र अवलंबण्यापलीकडे जगभरात वापरले जाणारे अद्ययावत तंत्रज्ञान आणि कौशल्य यांचा वापर करावा. न्यायमूर्ती एस्.सी. धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती विभा कंकणवाडी यांच्या खंडपिठासमोर डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणाची नुकतीच सुनावणी झाली. त्या वेळी त्यांनी वरील आदेश दिले. या वेळी यंत्रणांनी दोन गोपनीय अहवाल खंडपिठासमोर सादर केले.

याचिकाकर्त्यांचे अधिवक्ता अभय नेवगी यांनी ‘शासकीय तपासयंत्रणा तपासकामात आणि सर्व दोषींवर कारवाई करण्यात उदासीन आहे. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेलाही या कामी प्रतिपक्ष बनवावा. हत्या करणारे विदेशात गेले असल्याचे कळते. त्या दृष्टीने तपास करावा, राज्यशासन आणि ‘सीबीआय’ यांच्या अधिकार्‍यांवर व्यक्तीश: दायित्व निश्‍चिती करावी’, अशी विनंती केली. त्यावर खंडपिठाने ‘अधिवक्ता नेवगी यांनी यासंबंधी

८ सप्टेंबरपूर्वी प्रतिज्ञापत्र प्रविष्ट करावे’, असे सांगितले आहे. तोपर्यंत या प्रकरणाची सुनावणी स्थगित ठेवली आहे.


Multi Language |Offline reading | PDF