मोदी-जिनपिंग यांच्या भेटीमध्ये सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यावर सहमती

ब्रिक्स परिषदेची सांगता

चीनने शांतता प्रस्थापित करण्यावर कितीही सहमती दिली, तरी त्याच्यावर कोण विश्‍वास ठेवणार ?

  • डोकलामवर चर्चा नाही
  • सैन्यांमध्ये समन्वय निर्माण करणार

शियामेन (चीन) – येथील ब्रिक्स परिषदेच्या अंतिम दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली. या बैठकीत दोन्ही देशांच्या सीमेवर शांतता प्रस्थापित करण्याविषयी सहमती झाली. यानंतर पराराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेऊन दोन्ही नेत्यांमधील चर्चेची माहिती दिली.

१. परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव एस्. जयशंकर यांनी सांगितले की, सीमेवर शांतता प्रस्थापित करण्याविषयी दोन्ही देशांमध्ये सहमती झाली आहे. भविष्यात दोन्ही देशांमध्ये कोणतेही मतभेद झाले, तरी त्याचे रूपांतर वादामध्ये होऊ द्यायचे नाही, यावरही दोन्ही देशांनी पाठिंबा दर्शवला आहे. दोन्ही देशांतील सैन्यांमध्ये समन्वय निर्माण करण्यावर एकमत झाले. दोन्ही देशांमध्ये आतंकवादाच्या सूत्रावर कोणतीही चर्चा झाली नाही.

२. डोकलामच्या सूत्रावर काही चर्चा झाली का, याविषयी पत्रकारांनी प्रश्‍न विचारले असता जयशंकर म्हणाले, भविष्याचा विचार करून दोन्ही देशांमध्ये चर्चा झाली. भूतकाळात काय झाले यापेक्षा यापुढील वाटचालीवर चर्चा होणे आवश्यक आहे.

मसूद अझहरविषयीही चर्चा झाली नाही, असेही जयशंकर यांनी स्पष्ट केले.

३. या भेटीत पंतप्रधान मोदी म्हणाले की, ब्रिक्सला प्रासंगिक बनवण्यासाठी ही परिषद यशस्वी ठरली. यामुळे ब्रिक्स देशांमधील संबंध आणखी दृढ झाले आहेत.

चीनकडून पुन्हा पंचशीलचा नारा

चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग म्हणाले की, चीन आणि भारत प्रमुख शेजारी देश आहेत. दोन्ही विकसनशील आणि उदयोन्मुख देश आहेत. चीन आणि भारत एकत्र मिळून पंचशील करारांतर्गत काम करायला सिद्ध आहेत. (१९५४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान नेहरू यांनी चीनबरोबर हा करार केला होता. त्यातूनच हिंदी-चिनी भाईभाई असे म्हणण्यात येऊ लागले होते.) (पंचशील करार करून चीनने भारताला त्यात गुंतवले आणि नंतर आक्रमण केले. ही चूक भारत पुन्हा करणार नाही, हे चीनला सांगायला हवे ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF