ब्रिटनच्या मुसलमान महिला खासदाराची रोहिंग्या मुसलमानांसाठी वकिली

लंडन – ब्रिटनच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये (संसदेत) रोहिंग्या मुसलमानांच्या संदर्भात मजूर पक्षाच्या सदस्य यास्मिन कुरेशी यांनी परराष्ट्र मंत्री मार्क फिल्ड यांना ‘म्यानमारमधील वंशविच्छेदाचा तुम्ही निषेध करणार का ?’ असा प्रश्‍न विचारला. ‘गेली अनेक वर्षे रोहिंग्या महिलांवर बलात्कार आणि रोहिंग्यांची हत्या यांचे सत्र चालू आहे. यावर अजूनही आंतरराष्ट्रीय समुदाय गप्प का ?’, असाही प्रश्‍न त्यांनी केला. आपल्या सर्वांच्या डोळ्यांसमोर वंशविच्छेद होत आहे. गेल्या अनेक वर्षांमधील सर्वात वाईट प्रकारचा हिंसाचार तेथे होत आहे, या परिस्थितीत ताबडतोब हस्तक्षेप करण्याची आवश्यकता आहे, असे यास्मिन म्हणाल्या. (जगाच्या पाठीवर कोठेही मुसलमानांवर कथित अत्याचार झाले, तर त्यांचे धर्मबांधव धावून येतात, हिंदूंसाठी मात्र कोणीही येत नाही ! – संपादक)

यावर फिल्ड यांनी ‘या सर्व घटनांवर लक्ष ठेवून आहे. या प्रश्‍नी लक्ष द्यावे यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेला विनंती केली आहे. मागील ५ वर्षे इंग्लंड मानवतेच्या आधारावर त्यांच्यासाठी जवळपास ३ कोटी युरोंचे साहाय्य करत आला आहे.

म्यानमारमधील वांशिक तणाव तात्काळ संपवा ! – संयुक्त राष्ट्र सचिव

म्यानमारमध्ये चालू असलेला वांशिक तणाव आणि रोहिंग्यावर होणारा अत्याचार तात्काळ थांबवा, असे आवाहन संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो ग्युटर्स यांनी केले आहे. म्यानमारच्या राखीन प्रांतातील हिंसाचारामुळे गेल्या ११ दिवसांत १ लाख २५ सहस्र लोकांनी बांगलादेशात प्रवेश केला आहे.


Multi Language |Offline reading | PDF