वहात्या पाण्यात निर्माल्य-विसर्जन शक्य नसल्यास काय करावे ?

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘वहात्या पाण्यात निर्माल्य विसर्जित केल्याने त्यात असलेली दैवी पवित्रके पाण्यासह आसमंतात पसरतात. काही ठिकाणी जलप्रदूषण होऊ नये, यासाठी नगरपालिका, महापालिका आदी नदीमध्ये (वहात्या पाण्यामध्ये) निर्माल्य विसर्जन करण्यास प्रतिबंध करतात. ‘अशा परिस्थितीत आपद्धर्म म्हणून त्या निर्माल्याचे खत बनवायचे का’, असे काही जण विचारतात. या संदर्भात पंचतंत्रात सांगितले आहे,

सर्व-नाशे समुत्पन्ने अर्धं त्यजति पण्डितः ।

अर्धेन कुरुते कार्यं सर्व-नाशो हि दुस्तरः ॥ पञ्चतंत्र, ४.२८॥

अर्थ : जेव्हा सर्वनाश जवळ आला असतो, तेव्हा बुद्धीमान मनुष्य स्वतःजवळ जे काही आहे, त्यातील अर्धे गमावण्याची सिद्धता ठेवतो. अर्ध्यातूनही (जीवन) कार्य चालू शकते; मात्र सर्वकाही गमावणे अत्यंत दुःखदायक असते.

अशा वेळी आपद्धर्म म्हणून त्या निर्माल्याचे खत बनवणे अयोग्य ठरत नाही; कारण खतामुळे दैवी पवित्रके काही प्रमाणात भूमीमध्ये जातात, त्यावर उभ्या रहाणार्‍या वृक्षाला आणि त्या वृक्षाची फळे, फुले, सावली आदींचा लाभ घेणार्‍या मनुष्याला त्याचा लाभ होतो.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले


Multi Language |Offline reading | PDF