मुझफ्फरपूर (बिहार) येथे ईदच्या नमाजासाठी ४ घंटे मालगाडी, तर १५ मिनिटे पवन एक्सप्रेस रोखली !

कायदाद्रोह करून रेल्वेगाड्या रोखणार्‍यांवर कारवाई करू न शकणारे शासनकर्ते आतंकवाद्यांवर काय कारवाई करणार ?

एकीकडे भारतात ईदच्या नमाजासाठी रेल्वेगाड्या रोखल्या जातात, तर दुसरीकडे पाकमध्ये हिंदूंच्या मंदिरात ईदसाठी बळी देणार्‍या प्राण्याला ठेवले जाते !

मुझफ्फरपूर (बिहार) – येथील रेल्वे जंक्शनवर बकरी ईदच्या वेळी नमाजपठण करण्यात आल्याने एक मालगाडी ४ घंटे, तर पवन एक्सप्रेस १५ मिनिटे रोखून ठेवण्यात आली होती. पहाटे ५ ते सकाळी ९.१५ या कालावधीत मालगाडी रोखण्यात आली होती.

मशीद समितीने बकरी ईदच्या दिवशी जंक्शनजवळील मशिदीमध्ये नमाजपठण करण्यात येणार असल्याने सकाळी ७ ते १० या वेळेत रेल्वेगाड्यांची ये-जा बंद करावी, अशी विनंती केली होती. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या गाड्या रोखून ठेवल्या. मशिदीबाहेर म्हणजे रेल्वे रूळ आणि फलाट यांवर उभे राहून मुसलमानांनी नमाजपठण केले.


Multi Language |Offline reading | PDF