कराचीमध्ये एका मंदिरात ईदला बळी देण्यासाठीच्या उंटाला ठेवल्याची चित्रफीत उघड

गोरक्षकांच्या विरोधात बोलणारे आता गप्प का ?

पाकमधील हिंदूंची आणि त्यांच्या धार्मिक स्थळांची स्थिती ! याविषयी भारतातील एकही पुरोगामी, निधर्मीवादी, साम्यवादी तोंड उघडत नाहीत हे लक्षात घ्या !

मुसलमानबहुल देशात किंवा एखाद्या देशातील भागात अल्पसंख्यांकांची स्थिती अशीच असते, हे निधर्मीवाद्यांना कळेल तो सुदिन ! हिंदू बहुसंख्य असले, तरी कधीही असे करणार नाहीत, उलट शीख गुरुद्वारात, तर हिंदू मंदिरात ईद साजरी करण्यास, नमाजपठण करण्यास देतात, ही त्यांची सहिष्णुताच आहे !

कराची – पाकिस्तानमधील दैनिक ‘एक्सप्रेस ट्रिब्यून’चे पत्रकार बिलाल फारूकी यांनी चंद्रप्रकाश खत्री यांच्याद्वारे पाठवलेली एक चित्रफीत ट्विटरवर पोस्ट केली आहे. यात कराचीमधील एका मंदिरात उंटाला बसलेले दाखवण्यात आले आहे. तसेच आतमध्ये एक दुचाकीही ठेवण्यात आल्याचे दिसत आहे. या पोस्टमध्ये बिलाल यांनी लिहिले आहे की, ‘कराची विमानतळाजवळील एका मंदिरात ईदच्या वेळी देण्यात येणार्‍या बळीचा प्राणी ठेवण्यात आला आहे. लज्जास्पद !’ बिलाल यांनी ‘अल्पसंख्यांक हॅशटॅग’बरोबर हे ट्वीट केले आहे. या ट्वीटला साडेतीन सहस्रांहून अधिक लोकांनी रिट्वीट (प्रत्युत्तर) केले आहे. तसेच यावरून पाकमधील अल्पसंख्यांकांच्या स्थितीवरून प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

बिलाल फारूकी यांच्या या ट्विटवर पाकिस्तानच्या ‘डॉन न्यूज’ दैनिकाचे  पत्रकार अब्दुल्लाह राजपूत यांनी लिहिले आहे की, ही अत्यंत संवेदनशील घटना आहे. यामुळे अल्पसंख्यांकांना राग अनावर होईल.


Multi Language |Offline reading | PDF