नोटाबंदी भविष्यात लाभदायक ठरेल ! – रा.स्व. संघ

वृंदावन (उत्तरप्रदेश) – नोटाबंदीच्या निर्णयामुळे आधी देशातील जनतेला धक्का बसला; मात्र आता या धक्क्यातून देश सावरला आहे. देशाच्या भविष्यासाठी आणि पुढील वाटचालीसाठी नोटाबंदी लाभदायक ठरेल, हे लोकांना समजले आहे, असे रा.स्व. संघाने म्हटले आहे. वृंदावनमध्ये संघ आणि संघाशी संबंधित इतर संघटना यांची ३ दिवसांची बैठक पार पडली. यात संघाचे प्रचारप्रमुख श्री. मनमोहन वैद्य यांनी वरील मत मांडले. यापूर्वी संघाशी संबंधित भारतीय मजदूर संघ आणि भारतीय किसान संघ या संघटनांनी नोटाबंदीवरून केंद्र सरकारवर टीका केली होती.

या वेळी श्री. वैद्य यांना चीनमधून केल्या जाणार्‍या स्वस्त मालाच्या आयातीविषयी विचारण्यात आले. यावर ते म्हणाले की, संघ चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याच्या स्वदेशी जागरण मंचाच्या अभियानाला पाठिंबा देत आहे.

संघ आणि संघाशी संबंधित संघटनांमध्ये योग्य समन्वय रहावा, यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला सरसंघचालक श्री. मोहन भागवत, भाजप अध्यक्ष श्री. अमित शहा, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.


Multi Language |Offline reading | PDF