अखिल भारतीय आखाडा परिषद ११ भोंदू संतांची नावे घोषित करून त्यांच्यावर बहिष्कार घालणार !

भोंदू साधू-संतांच्या विरोधात सनातन संस्थेनेही प्रबोधन मोहीम यापूर्वीच चालू केली आहे !

प्रयाग – डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा राम रहिम यांना शिक्षा झाल्यानंतर अखिल भारतीय आखाडा परिषदने ११ जणांना भोंदू संत ठरवले आहे. या ११ जणांच्या नावांची सूची १० सप्टेंबरला प्रयाग येथील बाघंबरी मठात होणार्‍या बैठकीत उघड करण्यात येणार आहे. यात या भोंदू संतांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे, असे वृत्त दैनिक जागरणने प्रसिद्ध केेले आहे.

अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्रगिरी यांनी म्हटले आहे की, भोंदू संतांमुळे सनातन धर्माची मोठी हानी झाली आहे. आम्ही ही सूची केंद्र, सर्व राज्य सरकारे, चारही पिठांचे शंकराचार्य, १३ आखाडा परिषदेचे पिठाधिश्‍वर यांना पाठवणार आहोत. तसेच या भोंदू संतांना कुंभ, अर्धकुंभ आणि अन्य धार्मिक उत्सवांत सरकारी सुविधा मिळू नयेत, यासाठी प्रयत्न करणार आहोत.


Multi Language |Offline reading | PDF