क्षुल्लक कारणावरून धर्मांधांचे राष्ट्रीय पातळीवरील कुस्तीपटूवर प्राणघातक आक्रमण

भारतात असहिष्णुता वाढली असल्याचे दर्शवणारी घटना !

मेरठ – उत्तरप्रदेशच्या मेरठ जिल्ह्यातील मवाना गावातील परिक्षितगड बस स्थानकाजवळ धर्मांध जमावाने राष्ट्रीय पातळीवरील कुस्तीपटू संदीप किरण सिंह आणि त्यांच्या मित्राला अमानुष मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली. दोघांना पोलिसांनी वाचवले. नंतर धर्मांध जमावाने पोलीस ठाण्यात येऊन धिंगाणा घातला. पोलिसांनी लाठीमार करून त्यांना पांगवले. जातीय तणावामुळे अनेक दुकाने बंद करण्यात आली. या परिस्थितीत शांतता प्रस्थापित करण्यासाठी मोठ्या संख्येने पोलिसांना तैनात करण्यात  आले.

संदीप सिंह आणि त्यांचे मित्र दुपारी १२.३० वाजता एका दुचाकीवरून जात होते. बसस्थानकासमोर एका चारचाकी वाहनाने त्यांना धडक दिली. जेव्हा त्यांनी याचा विरोध केला, तेव्हा सुमारे ६ जण गाडीमधून बाहेर पडले आणि त्यांच्याशी वाद घालू लागले. त्या ६ युवकांनी काही दूरध्वनी केले आणि लवकरच सुमारे

५० धर्मांध गोळा झाले. या गटाने रोहित आणि संदीप यांच्यावर आक्रमण केले. लाठी आणि धारदार शस्त्रे वापरून त्यांना ठार मारण्याच्या हेतूने आक्रमण केले. एकाने गोळीबारही केला. रोहित आणि संदीप या दोघांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा धर्मांधांनी दगडफेक केली, ज्यामुळे बाजारात धावपळ झाली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस येथे आले आणि त्यांनी दोघांचे प्राण वाचवले.


Multi Language |Offline reading | PDF