(म्हणे) ‘जम्मू-काश्मीरमध्ये जिहाद तीव्र करणार !’ – जमात-उद-दावाची गरळओक

आतंकवादी त्यांच्या धर्मानुसार जिहाद पुकारल्याचे घोषित करतात, तर निधर्मीवादी त्यांना ‘धर्म नाही’ असे म्हणतात !

नवी देहली – जम्मू-काश्मीर भागात आता जिहाद आणखी तीव्र करणार आहोत, असे जमात-उद-दावाचा प्रमुख आतंकवादी अब्दुल रहमान मक्की याने हाफिज सईदप्रमाणेच भारताविरोधात विषारी फुत्कार सोडले आहेत. काही मासांपूर्वी अबू वलीद महंमद याला ठार करण्यात आले होते. त्याच्या स्मृतीदिनानिमित्त लाहोरच्या अल-दावा मॉडेल स्कूलमध्ये एका कार्यक्रमात तो बोलत होता. काश्मीर आपल्याला हिंदु शक्तींच्या तावडीतून सोडवायचा आहे, असाही दावा मक्कीने या वेळी केला.


Multi Language |Offline reading | PDF