गणेशोत्सवांतील देखाव्यात चित्र-विचित्र गणेशमूर्ती साकारून श्री गणेशाचे विडंबन !

गणेशभक्तांनो, मूर्तीशास्त्रानुसार श्री गणेशमूर्ती साकारून गणेशोत्सवाचा उद्देश सफल करा !

अशा प्रकारे श्री गणेशाची सोंड अती लांब बनवणे ही विकृतीची परिसीमाच !
दुष्काळाची भयावहता दाखवण्यासाठी दगडगोट्यामधील विचित्र आकारातील श्री गणेशमूर्ती बनवणे चुकीचे आहे !
कलेच्या नावाखाली बांबूच्या वस्तूंपासून अशा प्रकारे श्री गणेशमूर्ती बनवणे सयुक्तिक नव्हे !
चक्रापासून बनवलेल्या श्री गणेशमूर्तीत श्री गणेशाचे तत्त्व कधी तरी येईल का ?
समाजाचे प्रबोधन करण्यासाठी श्री गणेशाचा असा वापर नको !
छत्री उघडून ऐटीत उभा केलेल्या गणेशमूर्तीतून श्री गणेशाचे तत्त्व कसे येणार ?
३ हत्तींवर अनेक तोंडे असलेल्या या श्री गणेशाच्या मूर्तीऐवजी योग्य आकारातील मूर्ती हवी !

शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे त्या त्या देवतेच्या शक्तीशी निगडित असतात. त्यामुळे देवतेचे नाम, रूप, गंध आदींतून त्या त्या देवतेचे तत्त्व आकर्षित आणि प्रक्षेपित होते, उदा. ‘श्री गणेशाय नमः ।’ हे नाम, श्री गणेशाचे योग्य आकारातील रूप यांतून श्री गणेशतत्त्व प्रक्षेपित होते आणि त्याचा भक्तांना लाभ होतो. श्री गणेशाची मूर्ती ही मूर्तीशास्त्रानुसार योग्य मापांनुसार बनवली, तर त्यातून अधिकाधिक श्री गणेशतत्त्व प्रक्षेपित होते. मनाला येईल त्या आकारातून श्री गणेशमूर्ती साकारल्याने त्या देवतेचे तत्त्व त्यात येणे कठीण जाते. ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार भाविक श्री गणेशाचे आपल्या घरी खरोखरच आगमन झाले आहे, असे समजून सर्व करत असतात आणि त्याच भावाने त्याचे विसर्जन करतात. असे असतांना श्री गणेशाचे रूपच जर एवढे विकृत असेल, तर ‘श्री गणरायाचे आगमन झाले आहे’, असा भाव कुणाच्या तरी मनात निर्माण होईल का ? श्री गणेशाची भक्ती करावी, त्याची कृपा संपादन करावी, हा गणेशोत्सव साजरा करण्यामागचा उद्देश असतो. श्री गणेशाचे विकृत रूप समाजापुढे सादर करून श्री गणेशाची कृपा कधी तरी होईल का ? उलट अशा अश्‍लाघ्य आणि विकृत मूर्तींमुळे श्री गणेशाची अवकृपाच होणार नाही का ?

श्री गणपतीचे मानवीकरण करणे अयोग्य !

कुस्तीच्या प्रसाराचा हेतू चांगला असला, तरी त्यासाठी श्री गणेशाला अशा प्रकारे कुस्ती खेळतांना दाखवणे योग्य नव्हे !
विद्यार्थ्यांच्या समस्या सांगण्यासाठी विद्यार्थ्याच्या वेषात अशा प्रकारे श्री गणेशाला बसवणे सर्वथा अयोग्यच !
पार्वतीसमवेत खेळतांना उडता गणपति आणि त्यावर बसलेला उंदिर पहाणे योग्य वाटते का ?
श्री गणेशाची मूर्ती अन्य देवतेच्या (श्रीकृष्ण) रूपात दाखवल्याने श्री गणेशतत्त्वाचा लाभ होईल का ?
छत्रपती शिवरायांनी शाहिस्तेखानाची बोटे छाटल्याचा महाराष्ट्राची अस्मिता दर्शवणारा हा ऐतिहासिक प्रसंग ! परंतु श्री गणरायाला अशा प्रकारे महापुरुषांच्या रूपात दाखवल्याने श्री गणेशतत्त्वाचा लाभ कसा होईल ?
‘सर्जिकल स्ट्राईक’ ची धडक कारवाई करून भारतीय सैनिकांनी आतंकवाद्याचे तळ उद्ध्वस्त करून त्यांचे सामर्थ्य परत एकदा सिद्ध कले ! परंतु सैनिकांच्या या विजयाचे कौतुक करण्यासाठी सैनिकाच्या वेशातील श्री गणेशमूर्ती बनवणे योग्य कसे होईल ?
विद्यार्थ्यांच्या वेशातील श्री गणपति आणि त्याचे वाहन उंदीर खेळतांना शाळेसमोर दाखवल्याने विद्यार्थ्यांवर काय संस्कार होतील ? अशाने भावी पिढीच्या मनात देवतेविषयी भक्ती जागृत होईल का ?

काही ठिकाणी श्री गणरायाचे मानवीकरण करण्यात आले आहे, तर काही ठिकाणी त्याला अन्य देवतेच्या रूपात दाखवण्यात आले. छत्रपती शिवराय किंवा सैनिक यांच्या रूपात श्री गणेशाला दाखवून समाजाला काही तरी सांगण्याचा हेतू स्तुत्य असला, तरी त्यामुळे श्री गणेशमूर्तीची स्थापना करण्याचा उद्देश मात्र साध्य होत नाही. श्री गणेशमूर्ती मूर्तीशास्त्रानुसार योग्य असेल, तरच तिच्यातून चैतन्य प्रक्षेपित होऊन भाविकाला त्याचा लाभ होतो. काही ठिकाणी दुष्काळ किंवा विद्यार्थ्यांच्या समस्या सांगण्यासाठी श्री गणेशाचे  रूपच पालटून टाकले आहे. दगडाचा गणपति साकारला आहे किंवा श्री गणेशाला विद्यार्थ्याच्या रूपात दाखवले आहे. समस्येचा देखावा करू शकतो; मात्र श्री गणेशाची मूर्ती ही योग्य पद्धतीनेच साकारायला हवी. श्री गणेश ही उच्च कोटीची देवता आहे; कुणी बहुरूपी नव्हे की, हव्या त्या रूपात तिला साकार केले. त्यामुळे पहाणार्‍याच्या मनावरही श्री गणेश म्हणजे कुणी कार्टुन किंवा तत्सम चित्र-विचित्र आकारातील मूर्ती असे चित्र उभे रहाते. त्यामुळे श्री गणेशाचे सर्वांगसुंदर रूपाचे स्मरण करण्यापासून भक्त वंचित रहातो ! प्रत्येक देवतेचे तत्त्व भिन्न असल्याने अन्य देवतेच्या रूपातही श्री गणेशाला दाखवणे अयोग्य आहे. पुढील पिढ्यांनी अयोग्य रूपाला गृहित धरून त्याचेच अनुकरण केले, तर त्यास आपण उत्तरदायी राहू !

देवतेचे विडंबन झाल्याने धर्मद्रोह होऊन पाप लागते. ते टाळण्यासाठी योग्य आकारातील श्री गणेशमूर्ती बसवून श्री गणेशाची कृपा संपादन करा !


Multi Language |Offline reading | PDF