समंजस आणि देवाची ओढ असलेला ५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला विलेपार्ले, मुंबई येथील चि. नंदन विश्वजित दांडेकर (वय ३ वर्षे) !

चि. नंदन विश्वजित दांडेकर याला वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. नंदन दांडेकर हा एक आहे !

भाद्रपद शुक्ल पक्ष त्रयोदशी (४.९.२०१७) या दिवशी चि. नंदन विश्वजित दांडेकर याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आत्यांना लक्षात आलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

चि. नंदन विश्वजित दांडेकर

१. शांत स्वभाव 
अ. ‘नंदन झोपेतून उठल्यावर त्याला भूक लागली असली, तरी त्रास देत नाही. तो गप्प बसून रहातो.
आ. त्याचे वर्गातील शिक्षिकेने ‘सर्वात शांत मुलगा’, असे कौतुक केले आहे.

२. स्वावलंबी : एकदा सकाळी उठताच त्याने त्याची उशी उचलून पलंगावर ठेवून दिली.

३. समजंस
अ. तो घरी असल्यावर बराच वेळ एकटाच गाड्यांशी खेळतो.
आ. तो स्वयंपाकघरातील भांडी घेऊन भातुकलीतील चहा, शिरा आणि पोळी करून सगळ्यांना देतो.

४. अभ्यासाची आवड : त्याला अभ्यास करायला आवडतो. तो ‘स्लेट’ पाटीवरील अक्षरे गिरवण्यासाठी हात धरायला सांगतो. त्याला चित्रे रंगवायला आवडतात.

५. सहनशील 
अ. तो रुग्णाइत असतांनाही त्रास देत नाही. तो आईला औषध द्यायची आठवण करून देतो.
आ. नंदन सव्वादोन वर्षांचा असतांना त्याचा पाय दुखत असल्याने आधुनिक वैद्यांनी त्याच्या पायाला ‘प्लास्टर’ घातले होते. तो ‘प्लास्टर’ घालतांना आणि ३ आठवड्यांनी ते काढतांनाही रडला नाही. त्याने या काळातही काहीही त्रास दिला नाही. त्या वेळी तो बसून पुढे सरकत खेळायचा.

६. देवाची ओढ
अ. त्याला आरती करायला आवडते. तो ‘ॐ गं गणपतये नमः ।’, ‘श्री स्वामी समर्थ’ आणि ‘श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ असे म्हणून आरती करतो. तो आरतीनंतर सगळ्यांना विभूती लावतो आणि प्रसाद देतो.
आ. तो खेळण्यातल्या ठोकळ्यांची रचना बाप्पाप्रमाणे करून त्याला नमस्कार करतो.
इ. तो गायत्री मंत्र म्हणतो.

७. नंदनचे स्वभावदोष
अ. तो हट्टी आहे. त्याला सारखे बाहेर जायला हवे असते. त्याला बाहेर नेले नाही, तर तो रडतो.
आ. तो जेवायला वेळ लावतो.’- कु. सुनंदा दांडेकर (मुंबई) आणि सौ. अंजली काणे (नंदनच्या आत्या), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.८.२०१७)

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्हेाची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले      

यासमवेतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now