जळगाव येथील गणेश मंडळातील आरास पहाणार्‍या प्रेक्षकांवर अज्ञातांकडून दगडफेक

हिंदूंसाठी असुरक्षित झालेले उत्सव !

अशी स्थिती अन्य धर्मियांच्या उत्सवांच्या वेळी झाली असती, तर शहराची काय स्थिती झाली असती ?

जळगाव – येथील शिवाजीनगर भागातील गणेशोत्सव मंडळात रात्री साडेदहा वाजता अज्ञात समाजकटकांकडून आरास पहाणार्‍या गणेशभक्तांवर दगडफेक झाल्याने परिसरात पळापळ झाली. या दगडफेकीत एका लहान मुलीच्या पायाला दुखापत झाल्याने तिला रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले आहे. पोलीस तातडीने घटनास्थळी आल्याने पुढील परिस्थिती नियंत्रणात आली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात समाजकंटकांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.


Multi Language |Offline reading | PDF