जोशीमठ (उत्तराखंड) येथे शिखांनी मुसलमानांना ईदच्या दिवशी गुरुद्वारामध्ये नमाजपठण करू दिले !

आता मशिदींमधून प्रवचने आणि आरत्या चालू होतील का ?

देहराडून (उत्तराखंड) – गेल्या एक आठवड्यापासून पडणार्‍या मुसळधार पावसामुळे उत्तराखंडच्या चमोलीमधील जोशीमठचा काही भाग जलमय झाला आहे. यामुळे बकरी ईदच्या दिवशी मुसलमानांना मैदान उपलब्ध झाले नाही. त्यामुळे येथील शिखांनी त्यांना गुरुद्वारामध्ये नमाजपठण करण्यास सांगितले. यानंतर १ सहस्र मुसलमानांनी गुरुद्वारामध्ये नमाजपठण केले. (कठीण काळात शीख साहाय्यासाठी धावून आले, याची जाणीव मुसलमान ठेवतील का ? – संपादक)

१. जोशीमठ गुरुद्वारा समितीचे व्यवस्थापक बूटा सिंह म्हणाले की, या भागात एकही मशीद नाही आणि ईदच्या वेळेला गांधी मैदानात नमाजपठण केले जाते; मात्र तेथे पाणी भरले होते. यामुळे आम्ही त्यांना गुरुद्वारामध्ये नमाजपठणासाठी बोलवावे, असा निर्णय घेतला.

२. येथे भाजी विक्री करणार्‍या महंमद अस्लम याने सांगितले की, आम्हाला चांगले वाटले. बंधूभावाचे हे एक चांगले उदाहरण आहे. प्रत्येक व्यक्तीने यातून शिकले पाहिजे. (अस्लम यांनी प्रथम त्यांच्या धर्मबांधवांना हे सांगितले पाहिजे ! – संपादक)

३. येथील पोलीस निरीक्षक संजय कुमार यांनी सांगितले की, येथे उत्तरप्रदेशातील बिजनौर, सहारणपूर, नाजीबाबाद आणि मुरादाबाद येथून आलेले मुसलमान रहातात. यातील बहुतेक जण भाजी विक्री आणि लहान व्यापार करतात. (पुढे बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोर येथे येऊन लोकसंख्येचा समतोल बिघडवण्यापूर्वीच प्रशासनाने सतर्क झाले पाहिजे ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF