श्रद्धेच्या नावाखाली पशूहत्येला अनुमती देता येणार नाही ! – अलाहाबाद उच्च न्यायालय

प्रयाग (उत्तरप्रदेश) – अलाहाबाद उच्च न्यायालयात नुकतीच बकरी ईदच्या वेळी ३ दिवस प्राण्यांची हत्या करण्याची अनुमती मागणारी याचिका प्रविष्ट करण्यात आली होती. न्यायालयाने ती फेटाळून लावली. न्यायालयाने म्हटले की, देश कोणाच्या श्रद्धेनुसार नाही, तर राज्यघटनेनुसार चालणार आहे. श्रद्धेच्या नावाखाली पशूहत्येला अनुमती देता येणार नाही. कोशांबी येथील मदरसा जामिया इमाम उल उलूमचे महंमद इमरान यांनी ही याचिका प्रविष्ट केली होती. कोशांबीच्या जिल्हाधिकार्‍यांनी अवैध पशूवधगृह चालू करून पशूहत्या करण्याची अनुमती दिली नव्हती. त्यामुळे ही याचिका करण्यात आली होती.


Multi Language |Offline reading | PDF