आम्हाला वाटते तेच बोलू ! – भारताने चीनला ठणकावले

चीनमध्ये ब्रिक्स परिषदेला प्रारंभ

शिआमेन (चीन) – येथे ३ सप्टेंबरपासून ब्रिक्स देशांच्या परिषदेला प्रारंभ झाला. या परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहिले आहेत. यात चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी मोदी यांची भेट होण्याची शक्यता आहे. ‘या परिषदेत भारताने पाकपुरस्कृत आतंकवादाचे सूत्र उपस्थित करू नये’, असे चीनकडून सांगण्यात आले होते. यावर भारताने या परिषदेच्या आधीच उत्तर दिले आहे. भारताने म्हटले आहे की, आम्ही आमचे धोरण स्वतःच ठरवू. इतरांनी ते ठरवू नये. आम्हाला मांडायचे तेच आम्ही मांडू. ५ सप्टेंबरपर्यंत चालणार्‍या परिषदेनंतर पंतप्रधान मोदी ७ सप्टेंबरपर्यंत म्यानमारच्या दौर्‍यावर जाणार आहेत. भारतीय पुरातत्व खात्याने तेथे आनंद मंदिर भागात संशोधनाचे काम केले आहे. त्या ठिकाणीही ते भेट देणार आहेत. (पंतप्रधान मोदी यांनी म्यानमारमधून पलायन करणार्‍या हिंदूंना साहाय्य करण्याविषयीही चर्चा करावी, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक)

 


Multi Language |Offline reading | PDF