निर्मला सीतारामन् देशाच्या नव्या संरक्षणमंत्री, तर पियुष गोयल रेल्वेमंत्री

नवी देहली – ३ सप्टेंबरला केंद्रीय मंत्रीमंडळाचा विस्तार करण्यात आला, तसेच खातेवाटप करण्यात आले. यात अत्यंत महत्त्वपूर्ण असलेले संरक्षणमंत्रीपद निर्मला सीतारामन् यांना देण्यात आले आहे. त्या सरकारमध्ये गेली ३ वर्षे उद्योग आणि वाणिज्य खात्याच्या राज्यमंत्री होत्या. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यानंतर संरक्षणमंत्रीपद भूषवणार्‍या निर्मला सीतारामन् या दुसर्‍या महिला ठरणार आहेत. जगातील फ्रान्स, इटली, जर्मनी, हॉलंड, नॉर्वे, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलियासह १५ देशांच्या संरक्षणमंत्री महिला आहेत. रेल्वेमंत्रीपदाचे त्यागपत्र देणारे सुरेश प्रभु यांना वाणिज्य आणि उद्योग खाते देण्यात आले आहे. पियुष गोयल यांना रेल्वेमंत्री करण्यात आले आहे.

एकूण ४ कॅबिनेट आणि ९ राज्यमंत्री यांचा शपथविधी पार पडला. यात धर्मेंद्र प्रधान, पियुष गोयल, निर्मला सीतारामन् आणि मुख्तार अब्बास नक्वी यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. हे चौघेही राज्यमंत्री होते. त्यानंतर शिवप्रताप शुक्ल, अश्‍निनीकुमार चौबे, डॉ. वीरेंद्र कुमार, अनंतकुमार हेगडे, राजकुमार सिंह, हरदीपसिंग पुरी, गजेंद्रसिंह शेखावत, सत्यपाल सिंह आणि अल्फोन्स कन्ननथनम् यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.


Multi Language |Offline reading | PDF