अभाविपच्या विरोधात दलित संघटनांना नक्षलवाद्यांचे बळ ! – भाजप खासदार अमर साबळे यांचा आरोप

दलित संघटनांचे खरे स्वरूप !

पुणे – राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विरोधात दलित संघटनांना नक्षलवादी साहाय्य करत आहेत, असा आरोप भाजपचे खासदार अमर साबळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजप खासदारांच्या बैठकीत केला आहे. देहलीत नुकत्याच पार पडलेल्या संसदेच्या अधिवेशनाच्या कालावधीत मोदी यांनी वेगवेगळ्या राज्यांतील पक्षाच्या खासदारांच्या स्वतंत्र बैठका घेतल्या.

त्या वेळी साबळे यांनी वरील आरोप केला. खासदार अमर साबळे यांनी स्वतः बैठकीत वरील विषय मांडल्याचे मान्य केले. (खासदार साबळे यांनी या प्रकरणाची पाळेमुळे खणण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करावा, अशी जनतेची अपेक्षा आहे ! – संपादक) भारिप-बहुजन महासंघाचे नेते अधिवक्ता प्रकाश आंबेडकर यांनी ‘साबळे यांच्या आडून आंबेडकरी चळवळीला अपकीर्त करण्याचा भाजप आणि संघ यांचा कट आहे’, असे प्रतिपादन केले आहे.

साबळे यांनी पुढे म्हटले आहे की,

१. आदिवासी भागात विकासकामे होत असल्याने त्या समाजातून नक्षलवादी चळवळीत होणारी भरती न्यून झाली आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांनी दलित समूहावर लक्ष केंद्रीत केले आहे.

२. त्याचाच एक भाग म्हणून अभाविपच्या विरोधात दलित-आंबेडकरवादी संघटनांना उभे करण्याचा नक्षलवाद्यांचा डाव आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आणि भाग्यनगर (हैद्राबाद) येथील केंद्रीय विद्यापिठातील परिषदेच्या विरोधातील आंदोलने ही त्याची उदाहरणे आहेत.

३. रोहित वेमुलाच्या आत्महत्येनंतर भाजप आणि संघ यांच्या विरोधात देशभर आंदोलने झाली; परंतु वेमुला दलित नसतांना तो दलित असल्याचे सांगून लोकांची माथी भडकवण्यात आली.


Multi Language |Offline reading | PDF