एस्.एस्.आर्.एफ्.च्या स्पॅनिश भाषेतील अहं निर्मूलन या दुसर्‍या ग्रंथाचे पू. सिरियाक वाले यांच्या हस्ते प्रकाशन !

स्पॅनिश भाषेतीलअहं निर्मूलन या ग्रंथाचे प्रकाशन करतांना पू. सिरियाक वाले

१. १७.८.२०१७ या दिवशी एस्.एस्.आर्.एफ्.चे संत पू. सिरियाक वाले यांच्या शुभहस्ते ग्रंथ प्रकाशन !

अलीकडेच स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.)चा अध्यात्माचे प्रास्ताविक विवेचन हा स्पॅनिश भाषेतील ग्रंथ प्रकाशित करण्यात आला. त्यानंतर केवळ २ मासांच्या कालावधीत अहं निर्मूलन हा स्पॅनिश भाषेतील ग्रंथही प्रकाशित करण्यात आला. १७.८.२०१७ या दिवशी एस्.एस्.आर्.एफ्.चे संत पू. सिरियाक वाले यांच्या शुभहस्ते या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. पू. सिरियाक वाले एस्.एस्.आर्.एफ्.च्या जगभरातील साधकांना त्यांच्या साधनेविषयी मार्गदर्शन करत आहेत.

 २. ग्रंथ-निर्मितीतील सहभाग

डावीकडून एल् साल्वाडोर येथील कु. अमादा, पेरू येथील सौ. कॅरन रॉद्रीगेज आणि मेक्सिको येथील कु. मारियेला गोमेझ

या ग्रंथाचे भाषांतर आणि अंतिम पडताळणी बोलिव्हिया येथील सौ. सिल्विया दत्तोली आणि मेक्सिकोच्या कु. मारियेला गोमेझ यांनी केली आहे.

३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून मिळालेले ज्ञान आता जगभरातील जिज्ञासूंसाठी उपलब्ध !

दक्षिण अमेरिकेतील एल् साल्वाडोर येथील कु. अमादा, मेक्सिको येथील कु. मारियेला गोमेझ आणि पेरू येथील सौ. कॅरन रॉद्रीगेज यांच्यासमवेत अन्य विदेशी साधकही या सोहळ्याला उपस्थित होते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून मिळालेले ज्ञान आता अनेक भाषांमध्ये भाषांतरित होऊन ते जगभरातील जिज्ञासूंसाठी उपलब्ध होत असल्याबद्दल सर्वांनी कृतज्ञता व्यक्त केली.

४. चिरंतन अध्यात्मशास्त्राचा प्रसार जगभरव्हावा, या उदात्त हेतूने कार्यरत असलेली एस्.एस्.आर्.एफ्. ही सेवाभावी संस्था आणि अमूल्य आध्यात्मिक ज्ञानाचा प्रसार विनामूल्य करणारे एस्.एस्.आर्.एफ्.चे संकेतस्थळ !

एस्.एस्.आर्.एफ्. ही आध्यात्मिक संशोधन करणारी एक सेवाभावी संस्था असून अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि युरोप या देशांमध्ये तिची नोंदणी झालेली आहे. जगभरातील लोकांमध्ये सोप्या शास्त्रीय भाषेत सनातन धर्मातील चिरंतन अध्यात्मशास्त्राचा प्रसार करण्याच्या उद्देशाने या संस्थेची स्थापना करण्यात आली. भारतियांना सहस्रो वर्षांपासून होणारा या ज्ञानाचा आणि चिरंतन सत्याचा लाभ जगभरातील सर्वांना व्हावा अन् त्यांनी साधना करून स्वतःची आध्यात्मिक उन्नती करून घ्यावी, या उद्देशाने हे संकेतस्थळ कार्यरत आहे. इंटरनेट (माहितीजाल) हे एस्.एस्.आर्.एफ्.च्या संपर्काचे प्रमुख साधन असून एस्.एस्.आर्.एफ्.कडे असलेली माहिती संकेतस्थळावरून विनामूल्य प्रसिद्ध केली जाते.

 


Multi Language |Offline reading | PDF