म्यानमारमधून येणाऱ्यां शरणार्थी रोहिंग्या मुसलमानांना बांगलादेशने हाकलले !

इस्लामीबहुल देश अन्य देशांतील मुसलमानांना हाकलून लावतो, तर हिंदुबहुल भारत बांगलादेशी घुसखोरांना पोसतो !

ढाका – म्यानमारच्या राखिन प्रांतात गेल्या काही दिवसांपासून रोहिंग्या मुसलमान आतंकवादी आणि म्यानमारचे सैन्य यांच्यात हिंसाचार चालू आहे. यामुळे अनेक रोहिंग्या मुसलमान नागरिक घर सोडून बांगलादेशमध्ये पलायन करत आहेत; मात्र बांगलादेशच्या सीमा सुरक्षा दलाकडून या रोहिंग्या मुसलमानांना सीमेवरून हाकलून लावण्यात येत आहे. तरीही ३ सहस्र रोहिंग्यांनी बांगलादेशात आश्रय घेतला आहे. येथे त्यांच्यासाठी साहाय्यता केंद्रे निर्माण करण्यात आली आहेत. रोहिंग्या आतंकवाद्यांनी राखिनमधील ३० पोलीस ठाण्यांवर आक्रमण केल्यानंतर सैन्याकडून कारवाई करण्यात येत आहे. ही कारवाई अद्यापही चालू आहे.


Multi Language |Offline reading | PDF