राष्ट्रीय स्तरावरील भावसत्संग चालू झाल्यापासून कु. अमृता (वय १५ वर्षे) आणि कु. गौरी (वय १७ वर्षे) मुद्गल यांच्यामध्ये त्यांची आई सौ. वैशाली मुद्गल यांना जाणवलेले पालट !

कु. अमृता मुद्गल

१. कु. अमृता हिच्यामध्ये झालेले पालट

१ अ. लयबद्ध बोलणे : अमृता आता लयबद्ध बोलते.

१ आ. आईला वेळ देणे आणि तिच्याशी प्रेमाने बोलणे : यापूर्वी अमृता मला वेळ देत नव्हती. ती माझ्याशी अधिक बोलतही नव्हती. भावसत्संग चालू झाल्यापासून ती माझ्याशी प्रेमाने बोलते अन् मला वेळ देते. आता ती माझ्याकडे आई म्हणून न बघता साधिका म्हणून बघते.

१ इ. साधनेत साहाय्य करणे : माझे कुठे चुकले, ते ती तत्त्वनिष्ठतेने सांगून मला साधनेत साहाय्य करते. ती माझी मुलगी नसून एक आध्यात्मिक मैत्रीण झाली आहे. त्यामुळे साधनेत पुढे जाण्यासाठी आणि व्यावहारिक जीवनात ती मला प्रेमाने, मायेने आणि भाव ठेवून साहाय्य करते.

१ ई. इतरांना भावाचे प्रयत्न सांगून प्रसंगातून बाहेर पडण्यास साहाय्य करणे : लहान मुले, मोठे आणि वयस्कर साधक असो, त्यांना कोणता भाव जोडून एखाद्या प्रसंगातून बाहेर येता येईल, असे दृष्टीकोन देऊन ती त्यांना त्या प्रसंगातून बाहेर काढते. हे मला ठाऊक नव्हते; पण आश्रमात १० – २० साधकांनी तिचे कौतुक केले. ते म्हणतात, केवळ अमृतामुळेच आम्ही या प्रसंगातून बाहेर पडलो.

मी तिला विचारले, हे तुला कसे सुचते ? तेव्हा ती म्हणाली की, जे भावसत्संगात सांगतात, ते आपण अंतर्मनातून शिकून कृतीत आणायचे. त्या वेळी देव साहाय्य करत असतो. मी काहीच करत नाही. कर्ता-करविता ईश्‍वर आहे. सतत देवाला शरण जाऊन प्रार्थना आणि कृतज्ञता व्यक्त करायची.

१ उ. प्रेमभाव वाढणे : ती माझ्या डोक्यावरून मायेने हात फिरवते, तेव्हा माझ्या शरिरात पुष्कळ चैतन्य जात आहे, असे मला जाणवते.

१ ऊ. दिवसभर उत्साहाने आणि आनंदाने सेवा करणे : ती दिवसभर उत्साहाने आणि आनंदाने सेवा करते. रात्री उशिरा झोपते. तिला विचारले, तू एवढी लहान असून इतकी सेवा कशी करतेस ? थकत कशी नाहीस ? त्यावर ती म्हणाली, मी ही सेवा करत नाही. सद्गुरु बिंदाताईर्ंच्या खोलीत गेल्यावर सद्गुरु ताईंमध्ये सूक्ष्मातून एक महालक्ष्मीदेवीचे रूप दिसते. त्यांना अनेक हात दिसून त्यात वेगवेगळी शस्त्रे दिसतात. त्या शस्त्रांतून आणि तिच्या चैतन्यमय चरणांतून जी काही शक्ती मिळते, ती माझ्या छोट्या शरिरात प्रवेश करते. ती शक्ती आणि ते चैतन्य माझ्याकडून आनंदाने सेवा करून घेते. त्यामुळे हे शरीर आणि मन कधीच थकत नाही. दिवसा सेवा करते; पण रात्रीचाही दिवस असता, तर सेवेला बरे झाले असते. भावसत्संगापासून भाव आणि चैतन्य घेऊन सेवा केली जाते, असा तिचा भोळा आणि निर्मळ भाव झाला आहे.

– सौ. वैशाली मुद्गल (कु. अमृताची आई), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

कु. गौरी मुद्गल

२. कु. गौरी हिच्यामध्ये झालेले पालट

२ अ. सेवा

२ अ १. त्रासावर मात करून सेवारत रहाणे : गौरीला पाठीचा आणि पायदुखीचा तीव्र त्रास आहे. त्यामुळे ती जमेल तेवढीच सेवा करायची. ती सतत विश्रांती घ्यायची आणि सकाळी ८ वाजता उठायची. ती आता पहाटे ५.३० ते ६ पर्यंत उठते आणि आता परात्पर गुरु डॉक्टरांना सूक्ष्मातून भेटायला जायचे आहे. त्यांच्या चरणांत विलीन व्हायचे आहे, असा असा भाव ठेवते. भावसत्संग चालू झाल्यापासून ती सतत भावाच्या स्तरावर प्रयत्न करत आहे आणि त्रासावर मात करत आहे. तिला आता गुरुचरणांचा ध्यास लागला आहे. देवाला आनंद द्यायचा आहे. एक क्षण वाया घालवायचा नाही. जी काही सेवा आहे, तो गुरूंचा महाप्रसाद आहे आणि महाप्रसाद घेण्याचा लाभ करून घेऊया, असा भाव वाढला आहे.

२ अ २. सेवेची तळमळ वाढणे : तिची सेवा आनंदाने चालू आहे. तिला सेवा करतांना पाठीचा आणि पायाचा त्रास होतो, तेव्हा ती तिथे नामजप करते. नामजपामुळे तेथील वेदना न्यून होतात. मीच म्हणते, थोडी विश्रांती घेत जा, म्हणजे शरिराला बरे वाटेल. तेव्हा ती म्हणाली, आता आपल्याला हिंदु राष्ट्रासाठी घडायचे आणि तळमळायचे आहे. आता विश्रांती नाही. आजपासून हे शरीर आणि मन यांचे लाड बंद ! आपण शरीर आणि मन यांचे ऐकून सेवेत, साधनेत हानी करून घेतो. मी झोपले, तर वेदना काही अल्प होणार नाहीत. उलट विचार वाढतात आणि आपण देवापासून दूर जातो. भावसत्संगात सांगतात, तसे सतत भावस्थितीत रहायचे, म्हणजे वेदनांकडे लक्ष जात नाही.

सौ. वैशाली मुद्गल

२ अ ३. पुढाकार आणि दायित्व घेऊन सेवा करणे : तिला आधी सेवा स्वीकारता येत नव्हती; पण आता कुणी काहीही सेवा दिली, तर ती तत्परतेने हो म्हणते आणि भावाची जोड देऊन सेवा करते. ती आता पुढाकार आणि दायित्व घेऊन सेवा करते, हा भाग भावाने वाढला. सेवा करतांना भजने ऐकत किंवा नामजप करत सेवा संपवते. ती रात्रीही भजने ऐकते.

संतांची २ वेळा सेवा करते. मंत्रपठणाचे नियोजन बघते. रुग्णाईत साधकांना काय हवे-नको, ते स्वतःहून बघते. काही हवे असल्यास नेऊन देते. कलेचीही सेवा शिकून ती करते. माझी प्रकृती बरी नसेल, तेव्हा औषध, पाणी आणि अल्पाहार आणून देते. आता ती प्रथमच पुढाकार घेऊन सेवा करत आहे. आता तिला आनंद मिळत आहे. हे सर्व प.पू. डॉक्टर आणि सद्गुरु बिंदाताई यांच्यामुळेच करू शकत आहे, असा भाव ठेवून ती सर्व करत आहे. तिला भावसत्संगाचा लाभ होत आहे. हे पाहून मीही थोडे प्रयत्न करत आहे.

२ आ. साधनेचे गांभीर्य वाढणे : तिचा फलकावर चुका लिहिणे, खोलीत चुका सांगणे आणि क्षमा मागणे, हा भाग वाढला आहे. तिच्यासह सेवा करणारे सर्व जण तिचे कौतुक करतात.

२ इ. संतसेवा भाव ठेवून करणे : ती एका संतांना वेळेच्या ५ मिनिटे आधी औषध आणि चहा नेऊन देते.

२ ई. परात्पर गुरु डॉक्टर आणि संत भक्तराज महाराज यांची छायाचित्रे अन् काही देवतांची चित्रे यांत भावामुळे पालट होणे : तिच्याकडे दैनिक सनातन प्रभातमधील परात्पर गुरु डॉक्टरांचे एक छायाचित्र आहे. तिच्या भावामुळे त्यात पालट झाला आहे. त्या चित्रामध्ये मधल्या भागात पांढरा प्रकाश दिसतो. तिच्या खणातील संत भक्तराज महाराज यांचे छायाचित्र निळे होत आहे. श्रीकृष्णाचे चित्र जिवंत (सजीव) झाल्याचे जाणवत आहे. श्रीमहालक्ष्मीचे चित्र पिवळे झाले आहे. गुरुदेव दत्ताचे चित्र पूर्ण निळे झाले आहे. गौरीचा भाव आतून आहे. ती निरागस आणि निर्मळ मनाची आहे; म्हणून या चित्रांमध्ये पालट जाणवत आहते.

३. इतरांनी केलेले कौतुक

अ. परात्पर गुरु डॉक्टरांनी कळवले की, अमृता आणि गौरी यांच्या तोंडवळ्यात पुष्कळ पालट जाणवत आहे.

आ. एका संतांनी सांगितले, गौरी अगदी मनापासून सेवा करते. तिच्यामध्ये पुष्कळ पालट झाला आहे. तिच्याकडून मला तत्परता आणि नीटनेटकेपणा हे गुण शिकायला मिळाले.

इ. एका साधिकेने सांगितले, अमृता आणि गौरी या साक्षात् दोन देवतांच्या मूर्ती आहेत, असे त्यांच्याकडे पाहून जाणवते. भावाचा मूर्तीमय-भावसत्संग चालू झाल्यापासून त्यांच्या वागण्यात अन् बोलण्यातही पालट झाला आहे.

– सौ. वैशाली मुद्गल (कु. गौरीची आई), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.१२.२०१६)

सौ. वैशाली मुद्गल यांना आलेल्या अनुभूती

१. दोन्ही हात तोंडवळ्याला लावतांना हातातून चैतन्याचे निळे धबधबे तोंडवळ्यावर जात आहेत, असे जाणवणे

८.१२.२०१६ या दिवशी ध्यानमंदिरात नामजप झाल्यावर माझे दोन्ही हात मी तोंडवळ्याला लावतांना हातांतून निळ्या रंगाच्या चैतन्याचे धबधबे तोंडवळ्यावर जात आहेत, असे मला जाणवले. मला हे खरे वाटेना; म्हणून थोड्या वेळाने मी तोंडवळ्यावर हात फिरवला, तर पुन्हा तशीच स्पंदने जाणवली.

२. सोन्याचे मंगळसूत्र खाली पडलेले ठाऊकही नसतांना एका महिलेने ते परत देणे

आम्ही कोल्हापूरहून येथे येण्यासाठी निघालो. एका जागी बस थांबली; म्हणून मी पाय मोकळे करण्यास खाली उतरले. तेव्हा माझे सोन्याचे मंगळसूत्र खाली पडले, ते मला ठाऊकही नव्हते. तेथील एका महिलेने मला विचारले असता मी नाही म्हणाले. गळ्याला हात लावला असता लक्षात आले. तेव्हा माझे भजने म्हणणे, जयघोष आणि नामजप करणे यांकडेच लक्ष होते. तिने मला मंगळसूत्र दाखवले आणि म्हणाली, हे तुमचेच आहे. मी तिला धन्यवाद म्हटल्यावर ती महिला म्हणाली, मला म्हणण्यापेक्षा देवाचे आभार माना. पडलेले सोने मिळत नाही. तुम्हाला मिळाले. तुमच्यावर देवाची कृपा आहे. आपण कोठेही असलो, तरी देवाचे साधकावर किती लक्ष असते, हे माझ्या लक्षात आले. गुरूंच्या चरणी अनंत कोटी कृतज्ञ आहे.

– सौ. वैशाली मुद्गल, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.१२.२०१६)


Multi Language |Offline reading | PDF