एका आधुनिक वैद्यांनी दिलेल्या औषधांमुळे भयग्रस्त झालेल्या साधिकेला सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केलेल्या योग्य मार्गदर्शनामुळे भयमुक्त आणि रोगमुक्त झाल्याची आलेली अनुभूती

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

१. आधुनिक वैद्यांनी दिलेल्या गोळ्या जिवंत असेपर्यंत चालू ठेवाव्या लागतील, असे सांगितल्यामुळे मोठा रोग होऊन आपण मरणार, असे वाटून साधिकेला भीती वाटणेे

९ – १० वर्षांपूर्वी मी एका आधुनिक वैद्यांकडेे तपासणीसाठी गेले होते. त्यांनी माझी तपासणी केली आणि हृदयस्पंदनालेख (ई.सी.जी.) काढला. त्यांनी मला एक मासासाठी औषधे लिहून दिली आणि सांगितले, तुम्हाला जिवंत असेपर्यंत या गोळ्या चालू ठेवाव्या लागतील. त्यांचे बोलणे ऐकल्यावर आता मला मोठा रोग होणार आणि मी रुग्णाईत होऊन जाणार, हा विचार येऊन मी पुष्कळ घाबरले. माझ्या यजमानांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर श्रद्धा ठेव. त्यांच्याच कृपेने सर्वकाही ठीक होईल, असे सांगून मला धीर दिला.

२. मनातील भीती न्यून होण्यासाठी काही दिवस रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात रहायला जाणे, तेथे सेवेमुळे उत्साह वाढल्यावर, तसेच शारीरिक त्रास होत नसल्याने एक गोळी घेण्याचे बंद करणे

सौ. सुशांती मडगांवकर

नंतर मी एका साधिकेशी या विषयावर बोलले. तेव्हा ती साधिका मला म्हणाली, तुम्ही काही दिवस रामनाथी आश्रमात रहायला जा, म्हणजे तुमच्या विचारांत पालट होऊन तुम्हाला बरे वाटेल. तिने सुचवल्याप्रमाणे त्या साधिकेसह मी ४ दिवस रामनाथी आश्रमात रहायला गेले. आश्रमात स्वयंपाकघर, बांधकाम आणि लागवड येथे आम्हाला सेवा करायला मिळाली; म्हणून मी पुष्कळ उत्साहात होते. तेव्हा मला कोणता शारीरिक त्रासही होत नव्हता. आता आपले सर्व व्यवस्थित चालू आहे, तर एक गोळी बंद करून पाहूया, असे  ठरवून मी आधुनिक वैद्यांनी दिलेली एक बंद गोळी करून टाकली.

३. आश्रमात सद्गुरु डॉ. पिंगळेकाका यांना भेटून ओषधे दाखवल्यावर त्यांनी ही गोळी घेणे प्रकृतीसाठी हानीकारक असून ती बंद करून पहा, असे सांगून फॅमिली डॉक्टरांचेही मत घेण्यास सुचवणे

मी आश्रमातून घरी परतण्यापूर्वी एका साधिकेने सुचवल्याप्रमाणे मी सद्गुरु डॉ. पिंगळेकाका (तेव्हाचेे डॉ. पिंगळे) यांना भेटायला गेले. खरेतर त्यांना भेटण्याची माझी इच्छा नव्हती. आता मला बरे वाटत असतांना त्यांना कशाला भेटायचे ?, असा विचार माझ्या मनात येत होता; परंतु ती साधिका मला सद्गुरु पिंगळेकाकांकडे घेऊन गेली. त्यांना माझ्या गोळ्या आणि इतर औषधे दाखवली असता ते म्हणाले, ही गोळी तुम्ही घेण्यायोग्य नाही. ज्यांना हृदयाचा विकार आहे, त्यांनी ही गोळी चालू ठेवायची असते. ही गोळी घेणे तुमच्या प्रकृतीसाठी हानीकारक आहे. तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टरांनाही विचारा किंवा ४ दिवस गोळी बंद करून पहा. कोणता त्रास झाला नाही, तर चांगलेच आहे. त्या वेळी मी पटकन म्हणाले, मी सलग ४ दिवस ही गोळी घेतली नाही, तरी मला कोणताही त्रास झाला नाही.

नंतर फॅमिली डॉक्टरांना भेटल्यावर त्यांनीही या गोळ्या बंद करायला सांगितल्या. त्या वेळी सद्गुरु पिंगळेकाकांच्या चरणी माझी कृतज्ञता व्यक्त झाली.

४. प.पू. गुरुदेवांनी सद्गुरु पिंगळेकाकांच्या माध्यमातून उपचार केल्याचे जाणवून रोगमुक्त झाल्यानेे कृतज्ञता वाटणे

त्यानंतर मला कधीच उच्च रक्तदाबाचा त्रास झाला नाही. आता माझे वय ६१ वर्षे असून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने माझी प्रकृती ठीक आहे. प.पू. गुरुदेवांनी सद्गुरु पिंगळेकाकांच्या माध्यमातून माझ्यावर उपचार केले, असे मला जाणवते. ज्या वेळी मला सद्गुरु पिंगळेकाकांचे दर्शन होते, त्या वेळी वरील प्रसंगाची आठवण होऊन त्यांचे चरण घट्ट पकडून त्यांना कृतज्ञतापूर्वक म्हणावेसे वाटते, सद्गुरु पिंगळेकाका, तुमच्यामुळेच मी उच्च रक्तदाबाच्या त्रासापासून आणि इतर रोगांपासून मुक्त झाले आहे.

आम्ही परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळेच साधक, संत, तसेच सद्गुरु यांच्या कुटुंबात रहात आहोत. परात्पर गुरुमाऊलीच्या चरणी शरणागत भावाने कृतज्ञता व्यक्त करते आणि मागणे मागते, देवा, आमच्यावर अशीच कृपादृष्टी असू दे.

– सौ. सुशांती मडगांवकर, वास्को, गोवा. (२६.६.२०१७)

सौ. सुशांती मडगांवकर

वरील प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक


Multi Language |Offline reading | PDF